ETV Bharat / state

मुंबईमधील चौथ्या तर भाजपाच्या दुसऱ्या नगरसेवकाला कोरोनाची लागण - मुंबई कोरोना बातमी

मुंबईतील दहिसर येथील प्रभाग क्रमांक 2 च्या भाजपा नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे.

corona update
corona update
author img

By

Published : Jul 20, 2020, 12:24 PM IST

मुंबई - येथील हॉटस्पॉट असलेल्या दहिसर येथील प्रभाग क्रमांक 2 चे प्रतिनिधित्व करत असलेल्या भाजपाच्या नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आतापर्यंत मुंबईमधील कोरोनाची लागण झालेल्या नगरसेवकांचा आकडा चारवर गेला असून भाजपाचा दुसऱ्या नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस, पालिका, बेस्ट कर्मचारी, पत्रकार यानंतर नगरसेवकांना कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर मोठ्या इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर कोरोनाने झोपडपट्टीत शिरकाव केला. धारावी, वरळी मधील झोपड्या असलेले विभाग हॉटस्पॉट बनले होते. मात्र आता पुन्हा कोरोनाने इमारतींना लक्ष बनवले आहे. मुंबईत सध्या अंधेरी ते दहिसर, ग्रॅंटरोड आणि भांडुप, मुलुंड या विभागात कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळून येत आहेत. त्यासाठी पालिकेने मिशन झिरो आणि विभागवार फिरते दवाखाने सुरू केले आहेत.

मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असताना नगरसेवक, नगरसेविका नागरिकांना अन्न धान्य, आरोग्य सेवा मिळावी, विभागात स्वच्छता राखली जावी यासाठी प्रयत्न करत आहेत. यामधून माजी महापौर व वरळी येथील शिवसेनेच्या नगरसेविका, कुर्ला एलबीएस रोड विभागाचे शिवसेनेचे नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर भाजपाच्या मुलुंड येथील वॉर्ड क्रमांक 105 च्या नगरसेविका कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांच्या पती तसेच मुलालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता दहिसर येथील प्रभाग क्रमांक 2 चे प्रतिनिधित्व करत असलेले भाजपाचे नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. स्वतःला कितीही त्रास झाला तरी ते लोकांना मदत करत राहिले. ते लवकरच यामधून बरे होतील, असे भाजपा नगरसेवक संदिप पटेल यांनी म्हटले आहे.

कोरोनाची झपाट्याने वाढ

दहिसर विभागात एकूण 2 हजार 421 कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी 1 हजार 547 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 96 रुग्णांचा मृत्यू झाला असून 778 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सरासरी 1.26 टक्के इतका आहे. मात्र दहिसरमध्ये हाच दर 1.8 टक्के आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 55 दिवस असताना दहिसरमध्ये हा कालावधी 40 दिवस इतका आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.