ETV Bharat / state

कोरोनाचा ज्वेलरी उद्योगांना फटका, रत्ने आणि दागिन्यांची निर्यात घसरली

author img

By

Published : May 18, 2020, 5:01 PM IST

कोरोनाचा सर्व क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये ज्वेलरी उद्योगालाही मोठा फटका बसला आहे. रत्ने आणि दागिन्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात घसरली आहे.

coronavirus impact on gold business in mumbai
कोरोनाचा ज्वेलरी उद्योगांना फटका

मुंबई - कोरोनाचा सर्व क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये ज्वेलरी उद्योगालाही मोठा फटका बसला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात भारतातून रत्ने व दागिन्यांची निर्यात मार्चच्या तुलनेत 38 टक्क्यांनी घसरून 13744 कोटी रुपयांवर गेली आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये ही आकडेवारी 22 463.17 कोटी इतकी होती. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (जीजेईपीसी) च्या मते 2019-20 या वर्षात या क्षेत्राची एकूण निर्यात 2.51 लाख कोटी होती. 2018-19 मध्ये 2.75 लाख कोटी होती . 2019-20 या आर्थिक वर्षातील निर्यातीची टक्केवारी कमी आहे.
कुमार जैन (उपाध्यक्ष, मुंबई सोने चांदी व्यापरी संघटना )

मार्चमध्ये कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत 45 टक्के घट झाली आहे. कोरोना महामारीचा परिणाम जगभरातील व्यवसायांवर झाला आहे. या सर्वांचा परिणाम हिरा व्यापाऱ्यांवर झाला आहे. जगभरात रत्ने व दागिन्यांची मागणी कमी होत असल्याचे ही आकडेवारी दर्शवत आहे. असे असताना आता पुढे काय? हा मोठा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. त्यांची मागणी आहे सरकारने तातडीने या भागावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. त्यासाठी खास पॅकेज आणले पाहिजे. दरम्यान, यावेळी मार्चमध्ये कोरीव आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत 45 टक्क्यांनी खाली आली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये अशा हिऱ्यांची निर्यात 12 910.44 कोटी रुपये होती. यावेळी ती 7100.75 कोटी होती. पॉलिश हिरे संपूर्ण आर्थिक वर्षात 20.75 टक्क्यांनी घसरून 131980.87 कोटींवर गेले. सन 2018-19 मधील निर्यात 166532.07 कोटी रुपये होती. मार्चमध्ये सोन्याच्या दागिन्यांची निर्यात 40.07 टक्क्यांनी घसरली आहे.

सोन्याच्या दागिन्यांची निर्यात मार्चमध्ये 40.07 टक्क्यांनी घसरून 4152.39 कोटी रुपयांवर गेली. मार्च 2019 मध्ये त्याची निर्यात 6929.11 कोटी रुपये होती. संपूर्ण आर्थिक वर्षात सोन्याच्या दागिन्यांची निर्यात 7.77 टक्क्यांनी वाढून, 847477कोटी रुपयांवर गेली आहे. जी गेल्या वर्षीच्या 81,824.57 कोटी रुपयांवर होती. एप्रिल ते मार्च 2019-20 मध्ये चांदीच्या दागिन्यांची निर्यात 105.60 टक्क्यांनी वाढून 12,018.09 कोटी रुपये झाली. एका वर्षापूर्वी याची किंमत 5,845.37 कोटी रुपये होती. वर्षभरात रंगीत रत्नांची निर्यात 18.18 टक्क्यांनी घसरून 2,272.44 कोटी रुपयांवर गेली. याच काळात या क्षेत्राची आयात 74.7474 टक्क्यांनी घसरून 24.01 अब्ज डॉलरवर गेली, जी एका वर्षापूर्वी 25.48 अब्ज डॉलर्स इतकी होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.