मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि जगभर धुमाकूळ माजला आहे. राज्याच्या प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. राज्यातील करून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मंत्रालयातही एक संशयित रुग्ण आढळून आला. यानंतर मंत्रालयात मोठ्या प्रमाणात दहशत पसरली होती. तपासणीवर मंत्रालयातील सर्व मजल्यांची निर्जंतुक फवारणी केली. तसेच, सामान्य नागरिकांना पुढील आदेश येईपर्यंत मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
याबाबत पुरेशा प्रमाणात सर्वसामान्यांमध्ये माहिती न दिल्याने मंत्रालयात येऊन चौकशी करणाऱ्या नागरिकांची संख्या मात्र कायम आहे. मुक्त विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले आहे. त्यापासून व विविध कामाच्या निमित्ताने राज्यभरातील लोक दैनंदिन मंत्रालयात येतात. मंत्रालयात होणारी गर्दी लक्षात घेऊनच राज्य सरकारने सर्वसामान्यांना प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे आता फक्त मंत्री अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंत्रालयांमध्ये प्रवेश दिला जात आहे.
मंत्रालय प्रवेशद्वारावर काही सर्वसामान्य नागरिकांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता तसेच, टपाल सुपूर्त करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, मंत्रालय प्रवेशासाठी निर्माण केलेली पीओएस सुविधा पुढील आदेशापर्यंत बंद राहील, असे राज्य सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मंत्रिमहोदयांनी देखील राज्याच्या इतर भागातून अधिकाऱ्यांना बैठकांसाठी मंत्रालयात बोलावणेही थांबवले आहे. त्यामुळे मंत्रालयात गर्दी होणार नाही, असा राज्य सरकारचा होरा आहे. काल दिवसभर मंत्रालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सर्वप्रथम मुख्यमंत्री कार्यालय असलेल्या समजल्यापासून तळमजल्यापासून सर्वत्र निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुढाकाराने ज्या वस्तूंना लोकांचा स्पष्ट होतो. पिण्याच्या पाण्याचा कुलर, सरकते जिने, बाथरूमवरील लिंक सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण केले आहे. सर्व प्रशासन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपायोजना गुंतले असताना सर्वसामान्यांचे मात्र प्रवेशाअभावी हाल होत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा - #CORONA : औरंगाबादेत संशयित रुग्णांची संख्या 7, एक रुग्ण गायब
हेही वाचा - 'कोरोना'चा रुग्ण आढळल्याची बनावट पोस्ट सोशल मीडियावर प्रसारीत; अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल