मुंबई Corona Update : देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटनं डोकं वर काढलं असून पुण्यात नवीन व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण असल्याचं आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन उघड झालं आहे. आरोग्य विभागाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीवरुन सोमवारी राज्यात 61 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 70 रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. राज्यात रिकव्हरी रेट 98.17 टक्के नोंदवण्यात आला आहे, तर मृत्यूचं प्रमाण 1.81 टक्के आहे.
सोमवारी राज्यात आढळले 61 नवे कोरोना रुग्ण : सोमवारी राज्यात 61 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. सोमवारी महाराष्ट्रात एकूण 2728 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील 1439 आरटीपीसीआर तर 1305 आरएटी चाचण्यांचा समावेश आहे. राज्यात 250 रुग्णांना जे1 या नवीन कोरोनाच्या व्हेरियंटची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंट असलेल्या जे1 चे एकूण 682 रुग्ण होते. 6 जानेवारीपर्यंत देशभरातील 12 राज्यात कोरोना नवीन व्हेरियंटच्या जे1 चे रुग्ण असल्याचं स्पष्ट झालं होतं.
पुण्यात नवीन व्हेरियंटचे सर्वात जास्त रुग्ण : राज्यात नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. 6 जानेवारीपर्यंत देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. यात कर्नाटक 119, केरळ 184, महाराष्ट्र 139, गोवा 47, गुजरात 36, आंध्रप्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 30, तामिळनाडू 26, नवी दिल्ली 21, ओडिशा 3, तेलंगाणा 2 आणि हरियाणात 1 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर पुण्यात नवीन कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याचा दावा करण्यात येत आहे.
हेही वाचा :