ETV Bharat / state

Corona Viras : मुंबईत कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी केली जाणार - Corona Positive patients

देशभरात कोरोनाच्या प्रसाराला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्याचे निर्देश ( Instructions for performing genome sequencing tests ) दिले आहेत. मुंबईमध्ये सध्या रोज ५ ते ६ रुग्ण ( Corona Positive patients ) आढळून येत आहेत. त्या रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी ( genome sequencing test in Mumbai ) केली जाणार आहे.

Corona Viras
जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी
author img

By

Published : Dec 21, 2022, 6:31 PM IST

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला आहे. जगभरात पुन्हा एकदा कोरोना पसरेल असा इशारा आरोग्य संघटनांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईमध्ये सध्या रोज ५ ते ६ रुग्ण ( Corona Positive patients in Mumbai ) आढळून येत आहेत. त्या रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी केली जाणार आहे. या चाचण्यांसाठी लागणारे नमुने कमी असल्याने राज्यातील इतर लॅबमधून चाचण्या करून घेतल्या जातील. या चाचण्यामधून नवीन कोणता व्हेरियंट आहे का याची माहिती समोर येईल, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले.

जीनोम सिक्वेन्सिंग करणार : देशभरात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेची काय तयारी आहे याबाबत डॉ. संजीवकुमार यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते. यावेळी बोलताना, मुंबईमध्ये कोरोना आटोक्यात आहे. रोज ५ ते ६ रुग्ण आढळून येत आहेत. रोज ५ ते ६ रुग्ण नोंद होत आहेत. आम्हाला कस्तुरबा मधील जीनोम सिक्वेन्सिंगसाठी निर्माण करण्यात आलेल्या प्रयोगशाळेत ३७६ सॅम्पल लागतात. ते जमा होई पर्यंत वाट पाहावी लागेल. यासाठी राज्यातील ७ प्रयोगशाळेत कुठल्याही जिल्ह्यातील जीनोम सिक्वेन्सिंग केले जावे असा निर्णय घेण्यासाठी राज्य स्थरावर एक बैठक होणार आहे. सध्या मुंबईमध्ये एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनवर कोणत्याही प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जात नाही. केंद्र आणि राज्य सरकारने अद्याप कोणत्याही गाईडलाईन दिलेल्या नाहीत. गाईडलाईन आल्यावर त्याची अंमलबजावणी केली जाईल. कोविड सेंटर बंद असले तरी रुग्णालय सज्ज आहेत. सरकारच्या आदेशानुसार आणि गाईडलाईन नुसार कोरोना रुग्णसंख्या बघून खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल असे डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले. मुंबईमध्ये मास्क सक्ती नसली तरी नागरिक स्वताहून मास्कचा वापर करू शकतात, असेही ते म्हणाले.

११ लाख ५५ हजार रुग्ण : मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये पहिला रुग्ण ( Mumbai Corona patients ) आढळून आला. गेल्या अडीच वर्षात ११ लाख ५५ हजार ४९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार २६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १९ हजार ७४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ३९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. २ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १ लाख ९४ हजार ९३३ इतका नोंदवण्यात आलेला आहे. १३ ते १९ डिसेंबर या आठवड्यातील पॉजिटिव्हिटी रेट ०.०००३ टक्के इतका आहे.

कोणत्या लाटेत किती रुग्ण : मुंबईत मार्च २०२० पासून आतापर्यंत कोरोनाच्या चार लाटा येऊन गेल्या. पहिल्या लाटेत (मार्च २०२०) दिवसाला सर्वाधिक २८०० रुग्णांची नोंद झाली. जून २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेत दिवसाला ११ हजार, डिसेंबर २०२१ मध्ये तिसऱ्या आलेल्या तिसऱ्या लाटेत दिवसाला २१ हजार तर जून २०२२ मध्ये आलेल्या चौथ्या लाटेत २३०० अशी सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई मॉडेल : मुंबई आणि धारावी सारख्या सर्वात मोठ्या झोपडपट्टी विभागात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी कोविड उपाययोजनांचे २९ विविध मॉडेल्स तयार केले. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून जम्बो कोविड केंद्रांची उभारणी झाली, 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' सारख्या मोहिमेमुळे ३५ लाख कुटुंबांपर्यंत महानगरपालिका पोहोचली. रुग्णाला थेट कोविड अहवाल न देता प्रभाग कार्यालयाच्या माध्यमातून हा अहवाल देणारे मुंबई हे जगातील एकमेव शहर ठरले. धारावी पॅटर्न, रुग्णवाहिका, १४४ खाजगी रुग्णालयांना महापालिकेच्या डॅशबोर्डवर आणणे, ऑक्सिजन सुविधा, लसीकरणावर भर आदी स्वरुपाची असंख्य कामे या काळात झाली असून त्यासह मिशन झिरो, कोविड चाचण्या असे विविध मॉडेल्स तयार केले, त्यातून 'मुंबई मॉडेल' ची चर्चा जगभरात करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.