ETV Bharat / state

पॉझिटिव्ह रुग्णसंख्येवर ठरणार मुंबई लोकलचा निर्णय - विजय वडेट्टीवार - लोकल सेवा

मुंबईतील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता दिली जाणार आहे. परंतु मुंबईत कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट हा ५ पेक्षा जास्त असल्याने, मुंबईची उपनगरीय लोकल सेवा सध्या सुरू होणार नसल्याची माहिती, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

पॉझिटिव्ह रुग्णसंख्येवर ठरणार मुंबई लोकलचा निर्णय - विजय वडेट्टीवार

author img

By

Published : Jun 4, 2021, 2:50 AM IST

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य सरकारने (१५ जून २०२१) पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली. मात्र, आता कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असल्याने मुंबईतील लॉकडाऊनमध्ये शिथील दिली जाणार आहे. परंतु मुंबईत कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट हा ५ पेक्षा जास्त असल्याने मुंबईची उपनगरीय लोकल सेवा सध्या सुरू होणार नसल्याची माहिती, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यामुळे मुंबईकरांना लोकलची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

'मुंबईकरांना लोकलची प्रतिक्षाच'

गेल्या वर्षीपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षता मुंबईची उपनगरीय लोकल सेवा बंद केली होती. त्यानंतर (15 जून २०२१) पासून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. परंतु, सर्वसामान्यांसाठी लोकलचे दार तब्बल १० महिन्यापासून बंदच होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना राज्य सरकारकडून (1 फेब्रुवारी २०२१) पासून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासात मुभा दिली होती. मात्र, मुंबईसह राज्यात अवघ्या अडीच महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य शासनाने (१५ जून पर्यंत) कडक लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे (२२ एप्रिल २०२१) पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलचे दार पुन्हा एकदा बंद करण्यात आले. आता राज्यसह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, कोरोना पॉझिटिव्हिटी रेटनुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट (५. ५३) असल्याने मुंबईत फक्त लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. मात्र, मुंबई लोकलबाबतचा तूर्तास कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना लोकलची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

'पॉझिटिव्ह रेटवर ठरणार लोकलचा निर्णय'

राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, राज्यातील कोरोनाची रुग्ण संख्या कमी झालेली आहे. मात्र, ज्या जिल्हात पॉझिटिव्ह रेट लक्षात घेता लॉकडाऊन हटवणार आहे. ज्या जिल्हात ५ टक्के पॉझिटिव्ह रेट असणार, त्या जिल्हातील लॉकडाऊन हटवणार आहे. सध्या मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रेट (५. ५३) असल्याने मुंबईतील लॉकडाऊनमध्ये फक्त शिथिलता देण्यात येणार आहे. मात्र, तूर्तास सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलचे दार बंद असणार आहे. शिवाय प्रत्येक आठवड्याला राज्यातील सर्व जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रेटचा अभ्यास करून, लॉकडाऊन शिथिलताबाबाद निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आता मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रेटवर लोकल संबंधित घेणार आहे.

'प्रवाशांची होणार गैरसोय'

मुंबई-उपनगरात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर उद्यापासून ५० टक्क्यांनी सर्व व्यवहार सुरु होणार आहेत. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडणार आहेत. परिणामी लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. तसेच, उपनगरातून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईत कामाला येतात. मात्र, मुंबई, ठाणे आणि पालघर विभागाने एसटी बस कमी केल्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लावकर उपनगरीय लोकल सेवेबाबात निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.