ETV Bharat / state

धारावीत पालिकेचा आणि पोलिसांचा कासरा सैल; कोरोना प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता - Corona positive patient could increase dharavi

आतापर्यंत धारावीत 1924 कोरोना रुग्ण आढळले असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत अत्यंत दाटीवाटीने वेढलेली घरे असल्यामुळे कोरोनाचा प्रसारही या परिसरात वेगाने झाला होता. पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन योग्यती खबरदारी घेत धारावीचा कासरा गच्चधरून होते. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून हा कासरा सईल झालेला पाहायला मिळत आहे.

Dharavi, धारावी
Dharavi
author img

By

Published : Jun 10, 2020, 3:55 PM IST

मुंबई- आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत गेल्या 8 दिवसात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. त्याचबरोबर कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागली आहे. मात्र धारावीत कोरोनापूर्णपणे नाहीसा झालेला नाही. पण धारावीतील नागरिक रस्त्यावर कोणतीही काळजी न घेता गर्दी करत फिरत आहेत. पालिका आणि पोलीस यांनी जणू धारावीचा कासरा सैल सोडला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे.

मिशन धारावीतर्फे पालिका आणि खासगी डॉक्टरांनी राबवलेल्या मोहिमेत आतापर्यंत साडेपाच लाखांहून जास्त लोकांची तपासणी करण्यात आली आहे. मिशन धारावी मोहिमेला यश मिळाले असून कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेली धारावी आता सावरत असल्याचे चित्र आहे. पण लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यापासून धारावीचे रस्ते गजबजले आहेत. लोक मोठ्याप्रमाणात रस्त्यावर काळजी न घेता फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची भीती आहे.

आतापर्यंत धारावीत 1 हजार 924 कोरोना रुग्ण आढळले असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत अत्यंत दाटीवाटीने वेढलेली घरे असल्यामुळे कोरोनाचा प्रसारही या परिसरात वेगाने झाला होता. पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन योग्यती खबरदारी घेत धारावीचा कासरा गच्चधरून होते. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून हा कासरा सईल झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही लोक धारावीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची भीती व्यक्त करत आहेत.

राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने जोरदार मोहीम राबवत धारावीत कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यात यश मिळवले. मिशन धारावी अंतर्गत फिव्हर क्लिनिक , आयसोलेशन आणि विलगीकृत व्यक्तींसाठी कोरोना सेंटर्स, घरोघरी जाऊन तपासणी, ज्येष्ठांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासले जात होते, पोलीस गल्लोगल्ली फिरून लोकांना अनावश्यकवेळी बाहेर न पडण्यासाठी आवाहन करत होते. त्यामुळे धारावीतील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून हे काहीसे कमी झाले आहे, त्यामुळे पुन्हा धारावीत प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका, राज्य प्रशासन आणि पोलीस प्रशासन धारावीत सध्या पूर्वीसारखी होणारी गर्दी टाळण्यासाठी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काय करते हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

लॉकडाऊन शिथिल करताना अनेक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांची गर्दी होत आहे, मात्र रस्त्यावर पोलीस प्रशासन आणि महापालिकेचे कर्मचारीही सोशल डिस्टन्सिंग बाबतात आग्रही राहताना दिसत नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.