नवी मुंबई- नवी मुंबईत कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट होताना पहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एका दिवसात हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्येचा विक्रमी आकडा पाहणाऱ्या नवी मुंबई शहरात सोमवारी फक्त 94 रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळतं आहे.
दुसऱ्या लाटेत झाली होती कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत कित्येक पटीने रुग्णसंख्येत वाढ झाली होती, एका दिवसात 1700 इतक्या विक्रमी आकड्यांचे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते.
कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता लादले कडक निर्बंन्ध-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी रूग्णसंख्या पाहता आयुक्त अभिजित बांगर यांनी कडक निर्बंन्ध लादले व अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळाले.सोमवारी नवी मुंबई शहरात फक्त 94 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले व 180 कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले.
हेही वाचा- राज्यात 22 हजार 122 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 361 जणांचा मृत्यू