ETV Bharat / state

कोरोनाबाधिताच्या मृतदेहावर महापालिका कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी केले अंत्यसंस्कार - mumbai corona update

महानगरपालिकेच्या जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झालेल्या एकाच्या नातेवाईकांचा शोध लागला नाही. अखेरीस पालिका आणि पोलिसांनी अंत्यसंस्कार केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

mumbai
मृतदेहावर पालिका आणि पोलिसांनी केले अंत्यसंस्कार
author img

By

Published : Jun 1, 2020, 9:39 PM IST

मुंबई - कोरोनाचे मृतदेह रुग्णालयात, शवागृहात तासंतास पडून राहत असल्याचे प्रकार नेहमीच समोर येतात. त्यातील काही प्रकार नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास पुढे येत नसल्याने होतात. असाच प्रकार पालिकेच्या जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात घडला. कोरोनाने मृत्यू झालेल्या एकाच्या नातेवाईकांचा शोध घेऊनही शोध लागला नसल्याने अखेरीस पालिका आणि पोलिसांनी अंत्यसंस्कार केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात, वडाळा येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी ११ मे रोजी रात्री दाखल करण्यात आले होते. रक्तदाब, स्थूलपणा व हायपरथॉयराईड या इतरही आजारांनी ग्रस्त असलेल्या वर्मा यांना कोरोनाबाधित म्हणून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांची ऑक्सिजन पातळी ६० टक्केच होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांना योग्य व आवश्यक ते सर्व उपचार देण्यात आले. त्यानंतर ६ दिवसानी उपचारादरम्यान १७ मे रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करुन माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. यामुळे याबाबतची माहिती रुग्णालयातील पोलिसांना देण्यात आली. हा रुग्ण वडाळा येथील रहिवासी असल्याने त्याची माहिती वडाळा पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षकांना दिनांक १७ मे रोजी पहाटे २ वाजता देण्यात आली. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याची माहिती दिनांक १८ मे रोजी वडाळा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शवागारात मृतदेह राखण्याबाबतच्या नियमावलीचे संपूर्ण पालन या कालावधीमध्ये करण्यात आले होते. मात्र, नातेवाईकांशी संपर्कच होत नसल्याने सुमारे २७ तासानंतर अखेर वडाळा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे १८ मे रोजी पहाटे ४ वाजता मृतदेहाचा ताबा देण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिला नाही व त्यानंतर मृतदेहाचे दहन करण्यात आल्याचे पालिकेने कळविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.