मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सरासरी 27 दिवसांवर तर रुग्ण वाढीचा दर सरासरी 2.65 टक्क्यांवर आला आहे. मात्र, दहिसरच्या आर नॉर्थ विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 11 दिवस, कांदिवलीच्या आर साऊथ विभागात 15 दिवस तर बोरिवलीच्या आर सेंट्रल विभागात 16 दिवस इतका आहे. या तिन्ही विभागात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत असल्याचे महापालिकेने 7 ते 14 जून दरम्यानच्या प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
मुंबईत माटुंगा येथील एफ उत्तर विभागामध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 55 दिवसांवर पोहोचला आहे. तर, रुग्ण वाढीचे प्रमाण 1.3 टक्के म्हणजेच सर्वात कमी आहे. चेंबूर पूर्व येथील एम पूर्व विभागामध्ये रुग्ण दुप्पट व्हायला 53 दिवस लागलेले असून तेथील रुग्ण वाढीचाही सरासरी दर 1.3 टक्के इतका आहे. तर, खार येथील एच पूर्व विभागात 49 दिवस म्हणजेच 1.4 टक्के, दादार धारावी येथील जी उत्तर विभागात 48 दिवस म्हणजेच 1.5 टक्के, कुर्ला येथील एल विभागात आणि भायखळा येथील ई विभागात 46 दिवस म्हणजेच 1.5 टक्के इतका आहे. सॅन्डहर्स्ट रोड येथील बी विभागात 49 दिवस म्हणजेच 1.8 टक्के तर कुलाबा फोर्ट येथील ए विभागात 36 दिवस म्हणजेच 1.9 टक्के इतका आहे.
मुंबई महापलिकेच्या मरिन लाईन्स सी विभाग, अंधेरी पूर्व के ईस्ट विभाग, मालाड पी नॉर्थ, बोरीवली आर सेंट्रल, दहिसर आर नॉर्थ, कांदिवली आर साऊथ, भांडुप एस वॉर्ड, मुलुंड टी वॉर्ड या विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 20 दिवसाहुन कमी आहे. तर एबीडीएफ साऊथ, जी साऊथ, एच वेस्ट, के वेस्ट, एम वेस्ट, एन, पी साऊथ या विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 20 ते 40 दरम्यान आहे. तर ई, एफ नॉर्थ, जी नॉर्थ, एच ईस्ट, एल, एम ईस्ट या विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 40 दिवस ते 55 दिवस दरम्यान आहे.
विभाग आणि दुप्पटीचा कालावधी -
कुलाबा ए विभाग 36 दिवस
सॅन्डहर्स्ट रोड बी विभाग 39 दिवस
मरिन लाईन्स सी विभाग 20 दिवस
ग्रँटरोड डी विभाग 29 दिवस
भायखळा ई विभाग 46 दिवस
माटुंगा एफ नॉर्थ विभाग 55 दिवस
परेल एफ साऊथ विभाग 26 दिवस
दादर धारावी जी नॉर्थ विभाग 48 दिवस
एल्फिस्टन जी साऊथ विभाग 33 दिवस
खार एच ईस्ट विभाग 49 दिवस
बांद्रा एच वेस्ट विभाग 20 दिवस
अंधेरी पूर्व के ईस्ट विभाग 18 दिवस
अंधेरी पश्चिम के वेस्ट विभाग 30 दिवस
कुर्ला एल विभाग 46 दिवस
चेंबूर पूर्व एम पूर्व विभाग 56 दिवस
चेंबूर पश्चिम एम वेस्ट विभाग 24 दिवस
घाटकोपर ए विभाग 23 दिवस
मालाड पी नॉर्थ विभाग 18 दिवस
गोरेगांव पी साऊथ विभाग 22 दिवस
बोरिवली आर सेंट्रल विभाग 16 दिवस
दहिसर आर नॉर्थ विभाग 11 दिवस
कांदिवली आर साऊथ विभाग 15 दिवस
भांडुप एस विभाग 17 दिवस
मुलुंड टी विभाग 18 दिवस