ETV Bharat / state

कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान; नागपुरात ३१ मार्चपर्यंत टाळेबंदी वाढवली

जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील स्थिती गंभीर बनत चालली असून नागपुरातील टाळेबंदी 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. नागपुरात जीवनावश्यक वस्तूंसाठीच्या बाजारपेठेच्या वेळेत बदल करून निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

मंबई
मंबई
author img

By

Published : Mar 20, 2021, 7:27 PM IST

मंबई - राज्यात वाढत जाणारी कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील स्थिती गंभीर बनत चालली असून नागपुरातील टाळेबंदी 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. नागपुरात जीवनावश्यक वस्तूंसाठीच्या बाजारपेठेच्या वेळेत बदल करून निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहे. आज (दि. 20 मार्च) विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री नितीन राऊत यांनी माहिती दिली आहे.

रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहेत. ८० गुणांची लेखी परीक्षेसाठी याआधी तीन तासाचा वेळ दिला जात होता. मात्र, कोविड संकटामुळे दोन्ही वर्गांना ३० मिनिटे अधिक वेळ वाढवून देण्यात येणार आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांनाही २० मिनिटांचा कालावधी वाढवून दिला जाईल, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे कोरोनाबाधित

दरम्यान, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ठाकरे यांनी याबाबतची माहिती स्वत: ट्विट करून दिली. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

टाळेबंदीला टोकाचा विरोध नाही - फडणवीस

राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदी लागू करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टाळेबंदी हा पर्याय नाही. मात्र, प्रशासनाला असे वाटत असेल, तर आम्ही त्याला टोकाचा विरोध न करता त्याबाबत विचार करू, असे म्हटले आहे. नागपुरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नितीन राऊत यांनी बैठक आयोजित केली आहे. बैठकीआधी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

अँटीजेन चाचणी करूनच मुंबईत प्रवेश

मुंबईमध्ये गेल्या दीड ते दोन महिन्यात पुन्हा मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई शहरात रेल्वे, एसटी बसने प्रवेश करताना, चित्रपट गृहे, मॉलमध्ये प्रवेश करताना, खाऊ गल्ल्या, बाजार, फेरीवाले, पर्यटन स्थळे तसेच सरकारी कार्यालयात प्रवेश करताना अँटीजेन कोरोना चाचणी करावी लागणार आहे. अँटीजेन कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच मुंबई शहरात, चित्रपट गृहे, मॉल, कार्यालयात प्रवेश दिला जावा, असे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. तसे परिपत्रक महापालिकेने प्रसिद्ध केले आहे. मुंबईत दिवसाला गर्दीच्या ठिकाणी 47 हजार 800 अँटिजेन चाचणीचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे.

पुण्यात कोरोनाचा उच्चांक

पुणे शहरात दररोज सरासरी दीड ते दोन हजार रुग्ण वाढत आहेत. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर सरासरी 3 हजारपेक्षा जास्त रुग्ण दररोज वाढत आहेत. पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर गेल्या एक वर्षात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण हे 19 मार्च 2021 ला 2854 इतके सापडले आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात सरासरी दररोज 3 हजार नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. तर दहा दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 14 हजार 441 होती ती दहा दिवसांमध्ये 30 हजार 52 इतकी झाली असून दहा दिवसातच जिल्ह्यातील रुग्ण दुप्पट झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.