ETV Bharat / state

Corona Cases Hike in Mumbai : कोरोना वाढतोय; मुंबईकरांची मात्र बूस्टर डोसकडे पाठ - मुंबईतील कोरोनाची स्थिती

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. येत्या काही दिवसात रुग्णसंख्या आणखी वाढणार आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तरीही नागरिकांनी लसीचा बूस्टर डोस घेण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यावरून आता मुंबईकरांना कोरोना विषाणूची भीती राहिली नसल्याचे दिसत आहे.

Corona Increasing In Mumbai
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ
author img

By

Published : Apr 2, 2023, 7:33 PM IST

मुंबई: शहरात मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यापासून चार लाटा येऊन गेल्या आहेत. त्यांना थोपवण्यात पालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे. गेली काही महिने रुग्णसंख्या आटोक्यात होती. दिवसाला तीन ते सात रुग्ण आढळून येत होते. यामुळे मुंबईकर नागरिक बिनधास्त झाले होते. मार्चपासून मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे. सध्या मुंबईमध्ये कोरोनाचे १०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर ५० हून अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल असून २२ ते २५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आतापर्यंत एकूण ८१ लाख ४४ हजार ७८० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून १९ हजार ७४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बूस्टर डोसकडे दुर्लक्ष: मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्यावर रुग्णसंख्या तसेच मृत्यूची संख्या वाढत होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जानेवारी २०२१ पासून लसीकरण केले जात आहे. सुरुवातीला रुग्णसंख्या आणि मृत्यू वाढत असल्याने त्याच प्रमाणे प्रवास करताना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घेतले. दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस घेण्याकडे पाठ फिरवली आहे. आजही दिवसाला शंभरहून कमी नागरिक बूस्टर डोस घेत आहेत. आतापर्यंत १ कोटी ८ लाख ९३ हजार ४५८ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. ९८ लाख १४ हजार ८२९ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर केवळ १४ लाख ८७ हजार ९०९ नागरिकांनी लसीचा बूस्टर डोस घेतला आहे. ८३ लाख २६ हजार ९२० नागरिकांनी लसीचा बूस्टर डोस घेतलेला नाही.

लसीचा साठा नाही: मुंबईमध्ये कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन आणि कॉर्बोव्हॅक्स या लसीचे डोस देण्यात आले आहेत. सध्या ८३ लाख २६ हजार ९२० नागरिकांनी लसीचा बूस्टर डोस घेतलेला नाही. ही आकडेवारी खूप मोठी आहे. या नागरिकांना लसीचा डोस द्यायचे झाल्यास पालिकेकडे लसीचे डोस उपलब्ध नाहीत. सध्या पालिकेकडे केवळ आठ हजार लसीचे डोस आहेत. लसीचा साठा मिळावा म्हणून पालिकेने राज्य सरकारने कळविले आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लसीच्या साठा मिळवा म्हणून कळविले आहे. पाठपुरावा करूनही गेल्या दोन ते तीन महिन्यात पालिकेला हवा तसा लसीचा साठा उपलब्ध झालेला नाही.

भीतीचे कारण नाही: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे प्रसार वाढत असला तरी गंभीर म्हणून रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. इतर आजार असलेल्या रुग्णांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे असे इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे मुंबई अध्यक्ष डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले.

हेही वाचा: Sambhajinagar Riots Case : छत्रपती संभाजीनगर दंगल प्रकरण; आतापर्यंत 28 जण अटकेत, तर 50 जणांची ओळख पटली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.