ETV Bharat / state

कोरोना : राज्यात नवीन २८ रुग्णांची नोंद, एकूण संख्या १५३ - corona cases reached

जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता महाराष्ट्रातही वाढला आहे. आज राज्यात आणखी २८ कोविड-१९ रुग्णांची नोंद झाली आहे.

corona cases reached 153 in maharshtra
राज्यात आज नवीन २८ कोरोनाच्या रुग्णांची नोंद
author img

By

Published : Mar 27, 2020, 11:50 PM IST

मुंबई - जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता महाराष्ट्रातही वाढला आहे. आज राज्यात आणखी २८ कोविड-१९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १५३ झाली आहे. तर २४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

या नवीन रुग्णांमध्ये इस्लामपूरमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा तर नागपूरमधील बाधित झालेल्या रुग्णांच्या सहवासात आलेल्या 4 जणांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येकी २ रुग्ण मुंबई आणि ठाणे येथील असून पालघर, कोल्हापर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. तर १ रुग्ण गुजरात राज्यातील आहे. दरम्यान, आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ६५ वर्षाच्या एका वृध्देचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा राज्यातील कोरोनामुळे झालेला 5वा मृत्यू आहे. आज मुंबईतील एका खासगी रुग्णालयात एका ८५ वर्षीय डॉक्टरचा मृत्यू झाला. ही व्यक्ती कोरोना संशयित आहे. त्यांचे 2 नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता. तसेच त्यांना पेसमेकरही होता. त्यांचे निदान खासगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने त्याबाबत खातरजमा करण्यात येत आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे -

पिंपरी चिंचवड मनपा १३

पुणे मनपा १८

मुंबई ५१ मृत्यू ४

सांगली २४

नवी मुंबई , कल्याण डोंबिवली प्रत्येकी 6

नागपूर ९

ठाणे ५

यवतमाळ ४

अहमदनगर ३

सातारा, पनवेल प्रत्येकी २

उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया प्रत्येकी १

एकूण १५३ ५

मुंबई कार्यक्षेत्रातील मृत्यू

राज्यात आज एकूण २५० जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३ हजार ४९३ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३ हजार ५९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर १५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत २२ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १६ हजार ५१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, १ हजार ४५ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.