ETV Bharat / state

Mumbai Corona : कोरोनासंदर्भात मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! - कोरोनाचे रुग्ण वाढले

रोनाच्या नव्या सब व्हेरियंटमुळे ( A new subtype of corona ) रुग्णसंख्या वाढत ( Increase in the number of corona patients ) असून येत्या दिवाळी आणि इतर सणांच्या दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढेल ( corona patients Increase  ) असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

Mumbai Corona
Mumbai Corona
author img

By

Published : Oct 21, 2022, 7:45 PM IST

Updated : Oct 22, 2022, 3:11 PM IST

मुंबई - मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोनाचा प्रसार ( Spread of Corona ) आहे. या दरम्यान कोरोनाच्या चार लाटा आल्या. या लाटा थोपवण्यात पालिकेला यश आलं आहे. कोरोनाच्या नव्या सब व्हेरियंटमुळे ( A new subtype of corona ) रुग्णसंख्या वाढत ( Increase in the number of corona patients ) असून येत्या दिवाळी आणि इतर सणांच्या दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढेल असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ( corona patients Increase ) वाढत आहे. त्याचवेळी दुसरीकडे जून ते सप्टेंबर महिन्यापेक्षा ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

रुग्णसंख्या वाढताना मृत्यूच्या संख्येची नोंद - मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळून आला. या कालावधीत मुंबईमध्ये चार लाटा आल्या आहेत. या लाटा रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. गेल्या दोन ते महिन्यात रुग्णसंख्या कमी होत असताना पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना मुंबईमधील शुन्य मृत्यूच्या संख्येची नोंद होत आहे. मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १४३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात ११ वेळा, ऑक्टोबर महिन्यात १३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर महिन्यापेक्षा ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये सध्या ४ ते ७ हजार दरम्यान रोजच्या चाचण्या होत आहेत.

आतापर्यंत ११ लाख ५२ हजार ९९२ रुग्णांची नोंद - २० ऑक्टोबरपर्यंत एकूण ११ लाख ५२ हजार ९९२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३२ हजार २१७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०३७ सक्रिय रुग्ण (Active Corona Patients) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४९६८ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१४ टक्के इतका आहे.

अशी होतेय रुग्णसंख्येची नोंद - मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान दिवसाला २ हजार ८००, दुसऱ्या लाटेदरम्यान दिवसाला ११ हजार ५००, डिसेंबर २०२१ मध्ये तिसरी लाट आली ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती.

मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान दिवसाला २ हजार ८०० रुग्णसंख्यादुसऱ्या लाटेदरम्यान दिवसाला ११ हजार ५०० रुग्णसंख्या२०२१ मध्ये तिसरी लाटेदरम्यान ६ ते ८ जानेवारी सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खालीमे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९१८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद २२ सप्टेंबरला ९८ रुग्णसंख्या२६ सप्टेंबरला ५१ रुग्णसंख्या२७ सप्टेंबरला ८५ रुग्णांची नोंद
९ ऑक्टोबरला १७२ रुग्ण संख्या१० ऑक्टोबरला ११११२ ऑक्टोबरला १९४१३ ऑक्टोबरला १७९१४ ऑक्टोबरला १७८१५ ऑक्टोबरला १८०१६ ऑक्टोबरला १६७१७ ऑक्टोबरला ९६ १८ ऑक्टोबरला १२८१९ ऑक्टोबरला १४१
२० ऑक्टोबरला १४७ रुग्णांची नोंद झाली आहे.

पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता - मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोनाच्या नव्या XBB, Omicron – BQ.1 (US variant), BA.2.3.20 या सब व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. ऑक्टोबर 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात कोविड -19 च्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आगामी दिवाळी आणि इतर सणांचा हंगाम लक्षात घेता कोरोना प्रसारासाठी हा एक गंभीर कालावधी आहे. मोठ्या मेळाव्यांमध्ये होणारी गर्दी, सणांमध्ये कोविड-नियमांकडे होणारे दुर्लक्ष, कार्यक्रम, जत्रा, बंदिस्त आणि हवेशीर नसलेल्या जागांवर होणारी गर्दी यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

अशी घ्या काळजी -

- सणासुदीच्या काळात कोविड नियमांचे पालन करा
- कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले नसल्यास ते त्वरित करून घ्यावे. रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात आली असेल किंवा धोका असेल तर, बूस्टर व्हायरसपासून प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतात. यासाठी ज्यांनी बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी तो घ्यावा.
- बंद खोल्यांमध्ये व्हायरस पसरण्यास मदत होते. यासाठी घरामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
- लक्षणे असलेल्या रुग्णांशी जवळचा संपर्क टाळावा
- वारंवार हात धुणे
- शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल, टिश्यू पेपर वापरावा
- संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे
- कोरोना लक्षणे दिसू लागताच चाचणी करून घ्यावी. संक्रमणाची साखळी तोडता यावी म्हणून रिपोर्ट येई पर्यंत स्वत: ला इतरांपासून वेगळे करावे. कोरोनाची लागण झाल्याचे लवकर माहिती झाल्यास वेळेवर उपचार किंवा हॉस्पिटलायझेशन करता येईल.
- ज्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो, इम्युनोकॉम्प्रोमाइज केलेले रुग्ण आणि ज्यांनी नुकतेच कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या देशांना भेट दिली आहे अशा लोकांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

Last Updated : Oct 22, 2022, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.