ETV Bharat / state

Influenza - कोरोना पुन्हा मुंबईच्या उंबरठ्यावर, शहरात एच ३ एन २ चे २९ रुग्ण, ९ जण रुग्णालयात - 9 patients in hospital

मुंबईचा कोरोनाने पुन्हा एकदा दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केल्याची चिन्हे आहेत. एच3एन2ची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे भीती वाटत असली तरी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच रुग्णालये सुसज्ज करण्यात आली आहेत.

मुंबईत एच ३ एन २ चे २९ रुग्ण
मुंबईत एच ३ एन २ चे २९ रुग्ण
author img

By

Published : Mar 28, 2023, 5:05 PM IST

मुंबई - कोरोनाने राज्यासह देशात पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. त्यामुळे सतर्कता बाळगण्याची गरज आहे. देशभरात कोरोनासह इन्फ्लुएंझा आजाराच्या एच १ एन १, एच ३ एन २ या व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. विशेषकरून एच ३ एन २ चे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात काही मृत्यू झाल्याने देशभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबईमध्ये जानेवारी ते २७ मार्च या कालावधीत एच ३ एन २ या व्हेरियंटचे २९ रुग्ण आढळून आले आहेत. या एकूण रुग्णांचा विचार करता ९ जण दवाखान्यातच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.

एच ३ एन २ चे २९ रुग्ण - मुंबईत एच १ एन १ चे जानेवारी महिन्यात १८, फेब्रुवारीत ३९ तर मार्चमध्ये ५५ असे एकूण ११२ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच एच ३ एन २ चे जानेवारीत १, फेब्रुवारीत ७ तर मार्चमध्ये २१ असे २९ रुग्ण आढळून आले आहेत. एच १ एन १ व एच ३ एन २ चे एकूण १४१ रुग्ण आढळून आले आहेत. एच १ एन १ चे ५ तर एच ३ एन २ चे ९ असे एकूण १४ रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या ए वॉर्ड म्हणजे फोर्ट कुलाबा, डी वॉर्ड म्हणजे मलबार हिल, एफ साऊथ म्हणजे परळ लालबाग तसेच जी साऊथ म्हणजेच प्रभादेवी वरळी या विभागात इन्फ्लुएंझा आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. यावर्षी इन्फ्लुएंझामुळे गेल्या तीन महिन्यात एकही मृत्यू झालेला नाही अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबई महापालिका सज्ज - सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मुंबईत इन्फ्लूएंझा नियंत्रणासाठी ओसेल्टामिवीर (Oseltamivir) मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिका रुग्णालये, दवाखाने आणि प्रसूती गृहे यामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी Oseltamivir चा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी बफर स्टॉक सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. आरोग्य पोस्ट कर्मचार्‍यांना तापाच्या रूग्णांची ओळख पटविण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करून परिसरात आरोग्य जनजागृती उपक्रम राबविण्यात यावेत. चाचण्यांच्या निकालांची वाट न पाहता Oseltamivir ताबडतोब सुरू करावेत अशा मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाने जारी केल्या आहेत.

या रुग्णालयात चाचण्या - चाचण्यांचा आढावा घेता, कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 400 किट्स, केईएम हॉस्पिटलमध्ये 400 किट्स उपलब्ध आहेत. येथे चाचणी करता येणार आहे. दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 200 चाचण्या एका दिवशी करण्याची क्षमता आहे. कस्तुरबा हॉस्पिटल तसेच केईएम, नायर, सायन, कूपर या चारही मेडिकल कॉलेजमध्ये आयसोलेशन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सायन, केईएम, कूपर, नायर रुग्णालय तसेच 17 छोट्या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच सर्व मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये सुविधा करण्यात आली आहे. 24 तासांच्या आत ताप कमी न झाल्यास सर्व खासगी डॉक्टरांना मार्गदर्शक सूचना पाठवण्यात येत आहेत.

तर डॉक्टरांकडून औषधे घ्या - लक्षणांमध्ये सौम्य ताप, खोकला, घसा खवखव करणे, अंगदुखी, डोकेदुखी, श्वास लागणे छातीत दुखणे, हेमोप्टिसिस, हायपोटेन्शन, नखांचा रंग निळसर होणे आणि मुलांमध्ये चिडचिड आणि तंद्री अशी लक्षणे दिसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि खोकताना नाक झाका. ताप, घसादुखी, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास अंथरुणावर पूर्ण विश्रांती घ्यावी तसेच डॉक्टरांकडून वेळीच औषधोपचार करू घ्यावेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

हेही वाचा - Mumbai Corona Update: सावधान! तीन नवजात बालकांना कोरोनाची बाधा झाल्याचा संशय; चाचणीसाठी पाठवले मुने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.