मुंबई : संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हटल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहातील सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून गोंधळ घालायला सुरुवात झाली. संजय राऊत यांच्यावर हकभंगाची कारवाई करून तातडीने त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दोन्ही सभागृहात केली. दोन्हीही सभागृहाचे कामकाज या गोंधळात दिवसभरासाठी तळकूब करण्यात आले. मात्र राज्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आज कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
महागाईचा भस्मासुर : शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापली जात आहेत. महागाईचा भस्मासुर वाढत आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पी अधिवेशन हा वेळ महत्त्वाचा असतो. या अर्थसंकल्पी अधिवेशनात सामान्य जनतेची शेतकऱ्यांची प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचे असते. संजय राऊत यांनी विधिमंडळ चोर असल्याच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही. मात्र, त्यासाठी अधिवेशन बंद पाडणे योग्य नसल्याचे रोहित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
सरकार निवडणुकांपुरते काम करत : राज्य सरकार केवळ निवडणुकांपुरतं काम करत आहे. राज्यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी हे सरकार तयारी करत आहे. तसेच महापालिकेत आपली सत्ता आणण्यासाठी शिंदे गट, भारतीय जनता पक्ष काम करत असल्याचा टोलाही रोहित पवार यांनी यावेळी लगावला.
अब्दुल सत्तारांवर कारवाई का नाही : संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी आज दोन्ही साधनात सत्ताधारी पक्षाचे आमदार गोंधळ घालत आहेत. मात्र यात सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना भर प्रसारमाध्यमांमध्ये शिवी दिली. यावर सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आमच्या महिला नेत्या खासदार यांना शिवीगाळ केल्यानंतर ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावेळी सुरू असलेल्या अधिवेशनावेळी केवळ अब्दुल सत्तार यांचा निषेध नोंदवला त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मात्र कोठेही अधिवेशनाचा वेळ वाया जाईल अशी कृती केली नाही.
विरोधी पक्षाला देशद्रोही म्हटले : अधिवेशनाच्या वेळात सामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यायचा असतो. मात्र याचाच विसर सरकारी पक्षाला पडला असल्याचा टोलाही रोहित पवार यांनी यावेळी लगावला तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी चहापानाला न आलेल्या विरोधी पक्षाला देशद्रोही म्हटलं होतं. याबाबतही सत्ताधारी पक्ष काहीही बोलत नाही याची आठवण ही रोहित पवार यांनी करून दिली.
हेही वाचा - Jaitadehi ZP School : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी फुलवली बाग; शाळेत टरबूजाची पार्टी