मुंबई Year Ender 2023 : शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील काँग्रेस पक्ष जोरदार कामाला लागले होते. 2023 वर्षातील सुरुवातीचे महिने काँग्रेससाठी चांगले दिवस घेऊन येणार ठरलं होते. फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपा आणि संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर आणि अमरावतीत विजय खेचून आणला. पाच पैकी दोन जागांवर काँग्रेसने बाजी मारली. मार्च महिन्यात कसबा मतदार संघात गेल्या 28 वर्षापासून भाजपाची एकहाती सत्ता होती, पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपाला धोबीपछाड दिलं. यामुळं काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता.
बाळासाहेब थोरात नाराज : महाराष्ट्रात सत्ताधारी पक्ष एका बाजूला विकास कामांच्या धडाक्याने जनतेसमोर जात होता, तर दुसरीकडे काँग्रेसच्या अंतर्गत चव्हाट्यावर आला होता. नाना पटोले यांच्या विरोधातील एक गटाने थेट काँग्रेसचे पक्षश्रेष्ठीं मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पत्र लिहीत नाना पटोले हटाव अशा प्रकारची विनंती केली होती. त्या काळातच बाळासाहेब थोरात देखील नाना पटोले यांच्या निर्णयामुळं नाराज असल्याच्या चर्चा होत्या. ते आपल्या गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत देखील होते. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींना बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर करण्यात यश आलं होतं.
विरोधी पक्ष नेते पदावरून रस्सीखेच : मुंबई काँग्रेस अध्यक्ष काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांची वर्णी लागली. मुंबई शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमदार भाई जगताप यांच्यावर नाराजी असल्याकारणाने मुंबई काँग्रेस अध्यक्षपद वर्षा गायकवाड यांना त्या बहाल करण्यात आले. एका बाजूला राज्यामध्ये विरोधी पक्षातील अर्थात महाविकास आघाडीतील नंबर दोनचा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावर्षी फुटला, त्यानंतर विरोधी पक्ष नेते पदावरून रस्सीखेच पाहायला मिळाली होती. विरोधी पक्ष पदावर काँग्रेसने दावा ठोकत विजय वाडेट्टीवार यांची वर्णी लागली.
जनसंवाद यात्रेच आयोजन : इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सभेच्या माध्यमातून संवाद साधला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षातील निलंबित करण्यात आलेल्या खासदारांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकार विरोधात महाराष्ट्रभर काँग्रेसच्या वतीनं निदर्शने आणि आंदोलने करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीतून निघालेल्या भारत जोडो यात्रेच्या धरतीवर महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं.
काँग्रेस पक्षात फेरबदल : 4 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील विभागवार या यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं. जनसंवाद यात्रेला महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस पक्षात फेरबदल करण्यात आले आहे. रमेश चेनिथल्ला यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माणिकराव ठाकरे यांची गोवा, दिव दमन आणि नगर हवेली प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा -