ETV Bharat / state

विधानसभा 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं; प्रत्येकी 125 जागा लढवणार - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

विधानसभेच्या 288 जागांपैकी 125 जागा काँग्रेस तर 125 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढविणार आहे. तर उर्वरीत 38 जागा मित्रपक्षांना देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

शरद पवार
author img

By

Published : Sep 16, 2019, 4:31 PM IST

Updated : Sep 16, 2019, 6:09 PM IST

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करणार आहे. त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी 125 जागा काँग्रेस तर 125 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढविणार आहे. तर उर्वरीत 38 जागा मित्रपक्षांना देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

हेही वाचा - आदित्य ठाकरेंचा झाडे तोडायला विरोध, तर उद्धव ठाकरे मेट्रो भवनच्या भूमीपूजनात व्यस्त

यावेळी बोलताना पवार म्हणाले, काँग्रेस, एनसीपी, शेकाप, जोगेंद्र कवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर डावे पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील. विरोधी पक्षात राहण्यात अनेकांची मानसिकता दिसत नाही. मात्र, आपल्याला विरोधी पक्षात राहण्यात अधिक समाधान मिळते, असेही पवारांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

  • दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुका

यावेळी बोलतना शरद पवारांनी दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुका होतील, असे भाकितही केले आहे.

  • सरकार आपलेच येणार - शरद पवार

सरकारविरुद्ध जनमत आहे त्यामुळे सरकार आपलेच येणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

हेही वाचा - माजी गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे वृध्दापकाळाने निधन

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी 2009 मधील विधानसभा निवडणूक आव्हानात्मक असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसने 174 तर राष्ट्रवादीने 114 जागा लढवल्या होत्या. मात्र, 2014 मध्ये हे दोन्ही पक्ष वेगळे लढले. परणामी त्यांना सत्ता गमवावी लागली होती. त्यानंतर आता या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसला किती जागा मिळणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:Body:

नाशिक शरद पवार पीसी पॉइंटर

-विधानसभा निवडणूक जवळ आल्या आहेत 

- या आठवड्यात इलेक्शन कमिशन निवडणूका जाहीर करतील... 

- पंतप्रधान यांची नाशिक भेट झाल्यावर निवडणूक जाहीर होईल अशी अपेक्षा आहे

 - दिवाळीच्या अगोदर आठवडाभर मतदान होईल असा अंदाज आहे

 - काँग्रेस, एनसिपी, शेकाप, जोगेंद्र कवाडे, स्वाभिमानी राजू शेट्टी इतर डावे पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील

-निवडणूक बाबत शरद पवार यांचं भाकीत

 - नवी पिढी उभी केली जाईल

 - संयुक्त कॅम्पेन करण्याचा विचार आहे

 - विरोधी पक्षात राहण्यात अनेकांची मानसिकता दिसत नाही

 - विरोधी पक्षात राहण्यात मला अधिक समाधान मिळतं - शरद पवार - 

नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे - सत्ताधारी पक्षात जबाबदाऱ्या अधिक असतात

 - यापूर्वी अशी एकदा मेगा भरती झाली होती, 

- १९७७ मध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता तेव्हा

 - लोकांना हे काही समाधान देणारं नाही

 - आता मात्र वेग अधिक आहे

 - मुख्यमंत्री यांनी सर्वोत्तम काम केल्याच्या दाव्यावर जयंत पाटील पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार आहे

 - उदयनराजेंना समज यायला फार उशीर लागला, १५ वर्ष वाया गेली असं उदयनराजे म्हणाले होते

Conclusion:
Last Updated : Sep 16, 2019, 6:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.