मुंबई : यावेळी पुणे शहरात दिवसा एका तरुणीवर कोयत्याने हल्ला केला जातो. महिला आणि मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले. महिलांसाठी सुरक्षित असलेले महाराष्ट्र आणि मुंबई शहर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात उत्तर प्रदेश, बिहारसारखे जंगलराज झाले असल्याची जनतेची भावना समोर येतात आहे, अशी टीका कॉंग्रेसकडून करण्यात आली.
काँग्रेस रस्त्यावर उतरणार : कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसून काँग्रेस पक्ष मात्र गंभीर आहे. या परिस्थितीबाबत काँग्रेसने राज्यपाल व पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली होती. मात्र, कोणतीही सुधारणा झाली नसल्यामुळे वेळप्रसंगी काँग्रेस पक्ष कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणार, अशा इशारा कॉंग्रेस पक्षाने दिला.
काँग्रेस बळी पडणार नाही : लोकसभा मतदारसंघ निहाय 15 ते 20 जागा संदर्भात चर्चा झाली; मात्र पूर्ण चर्चा झाली नाही. 6 जुलैला पुढची बैठक होणार आहे. सध्या काही जागांवर साधक-बाधक चर्चा सुरू आहे. महविकास आघाडीसोबत आम्ही चर्चा करत आहोत. वज्रमूठ सभांना थोडा वेळ झाला आहे. हे आम्ही नाकारत नसल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. संभाजी भिडे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर काही बोललं पाहिजे असं वाटतं नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. सध्या ध्रुवीकरण करण्याचे काम सुरू आहे. लोकांची दिशाभूल करायची सुरुवात असून हा भाजपचा हा डाव आहे. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टींवर काँग्रेस बळी पडणार नाही.
केसीआर भाजपची 'बी' टीम: बिहार मधील पाटण्यात भाजप विरोधातील पक्षांची बैठक पार पडली. बैठकीला भाजप विरोधातील 15 पेक्षा जास्त पक्षांनी उपस्थिती लावली. केसीआर यांनीही निमंत्रण देण्यात आले होते; मात्र ते बैठकीत ते अनुपस्थित राहिले. यावरून ते कोणाची 'बी' टीम आहेत हे सिध्द होत आहे. येत्या काळात निवडणुका लागणार आहे आणि त्याआधी हे सगळं सुरू असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे.
या नेत्यांची उपस्थिती: मुंबई मधील बीकेसी येथील MCA क्लबमध्ये काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बस्वराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होते.
हेही वाचा: