मुंबई : भारत जोडो यात्रा राज्यात लवकरच दाखल होत ( Bharat Jodo Yatra) आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते के सी वेणूगोपाल व एच के पाटील राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत आयोजनबाबत आढावा घेणार ( Congress national leaders meeting ) आहेत. मात्र राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच राज्यतील उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहे परिणामी बेरोजगारी वाढत आहे. पोलीस भरती स्थगिती, कापूस, तूरची केंद्र शासनाकडून खरेदी सुरु करा. या विविध मागणीसाठी महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ उद्या सायंकाळी 5 वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार ( Congress leaders met Governor ) आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढाकारात हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे.
राज्यात दसऱ्यानंतर भरपूर पाऊस : राज्यात दसऱ्यानंतर भरपूर पाऊस पडला. पावसामुळे ठीक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्येच पाणी साचलं आणि उभारीला आलेलं पीक वाया गेलं नष्ट केलं. त्याच्यामुळे पिकावर परिणाम झाला. पालेभाज्या महागल्या. त्यामुळे नाना पटोले यांनी शासनाला आवाहन केलय की,' त्वरित कापूस तूर धान याचे खरेदी केंद्र सुरू करा अशी मागणी कालच शासनाकडे केलीय.
मोठ्या अडचणींचा सामना : महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्यावतीने काँग्रेस नेते राज्यपाल यांना भेटून शेतकऱ्यांच्या अडचणी मांडणार ( Rising inflation ) आहेत. राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत असून परतीच्या पावसाने राज्यातील बहुतांश खरीपाची पीके अक्षरशः पाण्यात वाहून गेली आहेत, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका ही पीके पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यातल्या त्यात काही जिल्ह्यामध्ये थोडासा कापूस आणि भाताचे पीक शेतक-यांनी मोठ्या कष्टाने वाचवले आहे. एकीकडे आस्मानी संकटापासून पीक वाचवणा-या शेतक-याला सरकारी अनास्थेला ही तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाच्या मान्यात आपल्या पोटच्या लेकरापेक्षा जास्त काळजीने जपलेले पीक आता पूर्ण नाही पण काही प्रमाणात हाती आले आहे. पण सरकारने अद्याप पुरेशा प्रमाणात कापूस आणि धान खरेदी केंद्र सुरु केली नाहीत. त्यामुळे शेतक-याना खासगी व्यापा-यानाच त्याचा शेतमाल विकावा लागतो आहे.
खासगी व्यापा-यांकडून लूट : अगोदरच आस्मानी संकटात उद्धवस्त झालेल्या शेतक-याची आता खासगी व्यापा-यांकडून लूट सुरु आहे. अशी शेतकऱ्यांच्या मध्ये तीव्र भावना दिसत आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजता आम्ही राज्यपाल महोदयांच्या राज्यातील हाताबाहेर गेलेली स्थिती नजरेस आणून देणार आहोत;असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधतांना सांगितले.