ETV Bharat / state

Sanjay Nirupam : गजानन किर्तीकरांचा राजीनामा घेणारच! तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही - संजय निरुपम

खासदार गजानन किर्तीकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला आहे. किर्तीकर यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे मतदारांना दिलेला धोका आहे. त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा (Sanjay Nirupam demanded Gajanan Kirtikar resign), अशी मागणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Congress leader Sanjay Nirupam demanded) यांनी केली आहे.

संजय निरुपम यांचा इशारा
संजय निरुपम यांचा इशारा
author img

By

Published : Nov 13, 2022, 4:06 PM IST

मुंबई : खासदार गजानन किर्तीकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला आहे. किर्तीकर यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातील मतदारांना दिलेला धोका आहे. त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा (Sanjay Nirupam demanded Gajanan Kirtikar resign), अशी मागणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Congress leader Sanjay Nirupam demanded) यांनी केली आहे. तसेच किर्तीकर राजीनामा देत नाहीत. तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये निरुपम बोलत होते.

राजीनामा द्यावा लागेल : या प्रसंगी निरुपम म्हणाले की, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांचा होता. त्यावर मला काही बोलायचं नाही. त्यांनी का आणि कोणत्या अमिषाला बळी पडून पक्ष सोडला ? यात मला जायचे नाही. पण माझे असे मत आहे की, शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढवली होती, धनुष्य-बाण चिन्हावर तुम्ही निवडून आला होता. आता जेव्हा तुम्ही पक्ष सोडला आहे. त्यामुळे तुम्हाला आता संसद सदस्य म्हणूनही राजीनामा द्यायला हवा. ही गद्दारी आहे. ज्या पक्षाने तुम्हाला सगळे काही दिले, ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी तुम्हाला जास्तीत जास्त मत देऊन निवडून आणले त्यांच्याशी विश्वासघात केलेला आहे. तुम्हाला जास्त मत मिळाली म्हणून तुम्ही निवडून आला आणि कमी मिळाली त्यामुळे मी पराभूत झालो. त्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, अशी मागणी निरुपम यांनी केली.

सर्वात जास्त निष्क्रिय खासदार : निरुपम पुढे म्हणाले, गजानन किर्तीकर (MP Gajanan Kirtikar) मागच्या साडे तीन वर्षांच्या कालखंडात उत्तर-पश्चिम मतदारसंघात कधीच दिसले नाहीत. मी सांगू शकतो की, देशातील सर्वात जास्त निष्क्रिय खासदार ते असतील. मी पराभूत उमेदवार असूनही त्यांच्यापेक्षा जास्त मी मतदारसंघात फिरलो. लोकांमध्ये जात राहिलो. काम करत राहिलो. मी एकदा माहिती काढली की किर्तीकर सध्या काय करत आहेत. तेव्हा कळले की त्यांची तब्येत बरोबर नाही. बरं ते मुंबईतही नव्हते. ते सर्वाधिक काळ पुण्यात राहायला असायचे. आता ते पुण्यात का होते ? काय करायचे ? कोणासोबत असायचे याबाबत मला जास्त बोलायचे (Congress leader Sanjay Nirupam) नाही.

बाईक रॅलीपासून आंदोलनाची सुरुवात : निरुपम पुढे म्हणाले की, किर्तीकर यांनी मुंबईच्या मतदारांचा विश्वासघात केला आहे, त्यामुळे किर्तीकर राजीनामा देत (MP Gajanan Kirtikar should resign) नाहीत. तोपर्यंत आम्ही आंदोलनाची सुरुवात करत आहोत. बाईक रॅलीपासून या आंदोलनाची सुरुवात होईल. त्यानंतर वेगवेगळ्या स्वरुपात हे आंदोलन होईल. जर किर्तीकर यांच्यात थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी हे आंदोलन सुरु करण्यापूर्वी राजीनामा द्यावा आणि पुण्यामध्ये आरामात उर्वरित आयुष्य घालवावे, अशी आक्रमक भूमिका निरुपम यांनी मांडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.