मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाकडून आलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार आहे. मात्र त्या आधी आज अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांनी विरोधकांवर टीका केली. बैठकीत सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ज्या सवलती मराठा समाजातील मुलांना मिळत आहेत, त्या चालू ठेवण्याबद्दल चर्चा झाली.
हेही वाचा - 'आधी विद्यार्थी आणि शिक्षकांना लस द्या, नंतच परीक्षा घ्या'
न्यायालयाच्या निर्णयावरू मागील सरकारची पोलखोल - पटोले
छत्रपती संभाजीराजे यांच्या दौऱ्याला विरोध नसल्याचा उल्लेख नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांनी केला. मागील सरकारने चुकीचा कायदा करून समाजाची दिशाभूल केली आहे. विरोधकांची पायाला दुखणे आणि डोक्याला पट्टी, अशी भूमिका आहे. विरोधकांकडून मराठा समाजात फूट पाडून सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. त्याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात जो निर्णय दिला, त्या निर्णयावरून मागच्या सरकारची पोलखोल झाली, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर निशाणा साधला. या बैठकीला बाळासाहेब थोरात, नाना पटोले, नितीन राऊत, विश्वजीत कदम, भाई जगताप, सचिन सावंत उपस्थित होते.
हेही वाचा - सरकारी कर्मचाऱ्याकडून तीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्यास सीबीआयकडून अटक