ETV Bharat / state

Balasaheb Thorat Criticize To Bjp नागपूरच्या अधिवेशनाचा आग्रह मावळला, बाळासाहेब थोरातांचा भाजपवर निशाणा - नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ( Nagpur Winter Session ) येत्या सोमवारपासून नागपूरला होत आहे. त्यावरुन काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात ( Congress Leader Balasaheb Thorat Criticize To Bjp )यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजप नेते आणि राज्यपालांकडून वारंवार महापुरुषांवर अवमान केल्याचा विषय हिवाळी अधिवेशनात लाऊन धरणार असल्याचेही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

Congress Leader Balasaheb Thorat
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Dec 13, 2022, 8:00 PM IST

मुंबई - कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानंतर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ( Nagpur Winter Session ) येत्या सोमवारपासून नागपूरला होत आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी विरोधकांची आहे. मात्र, विदर्भातील जनतेला न्याय देण्यासाठी अधिवेशन नागपूरला घ्या, असा भाजपचा एकेकाळी असलेला आग्रह आता मावळला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात ( Congress Leader Balasaheb Thorat Criticize To Bjp ) यांनी भाजपवर निशाणा साधला. कामकाज सल्लागार समितीची ( Working Advisory Committee ) आज बैठक झाली. त्यानंतर थोरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

नागपूर अधिवेशनचा कालावधी वाढवावा नागपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनचा कालावधी 30 डिसेंबरपर्यंत असेल. दोन आठवड्याचे अधिवेशन असले तरी मध्ये विविध सुट्ट्या आल्या आहेत. अधिवशेनाचा कालावधी वाढवून, तीन आठवड्याचे करावे, अशी आमची मागणी होती. शेतकऱ्यांचे प्रश्न, नैसर्गिक आपत्तीची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. वीज कनेक्शन कापण्यात येत आहेत. महाराष्ट्र - कर्नाटक सीमा ( Maharashtra Karnataka Border Dispute ) प्रश्नांवर सरकारने भूमिका मांडलेली नाही. ती राज्याला समजावी, अशी मागणी होती. परराज्यात जात असलेल्या प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी अवधी मिळावा. मागील दोन वर्षे कोरोनामुळे चर्चा करता आली नव्हती, त्यामुळे कालावधी वाढवावा, अशी मागणी केली होती. एकेकाळी नागपूरमध्ये अधिवेशन घ्यावे, मागणी लावून धरणारे आता सत्तेत येताच कालावधी वाढण्यास तयार नाहीत, असा हल्लाबोल थोरात यांनी भाजपवर केला.

भाजप नेते आणि राज्यपालांकडून महापुरुषांवर अवमान - भाजप नेते आणि राज्यपालांकडून वारंवार महापुरुषांवर अवमान केला जातो आहे. राज्यात संतप्त प्रतिक्रिया आहेत. अधिवेशनात हा विषय लावून धरणार आहोत, असे थोरात यांनी सांगितले. तसेच शरद पवार ( Ncp Chief Sharad Pawar) यांना आलेल्या धमकीवर राज्य सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिला नसल्याची टीका थोरातांनी केली. तसेच धमक्या देणाऱ्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणी केली.

सत्तेवर आल्यानंतर निर्भया पथकांचा सुरक्षेसाठी वापर - भाजप नेते गिरीष महाजन ( Bjp Leader Girish Mahajan Refused Z Security ) यांनी झेड सुरक्षा नाकारत असतील तर सरकारमधील आमदारांना का गरज पडत आहे. राज्यात सरकार सत्तेवर आल्यापासून निर्भया पथकाचा वापर केला जातो आहे. महाविकास आघाडीने ( MVA Goverment ) यापूर्वी कधीही निर्भया पथकांचा वापर केला नाही. मात्र, हे सरकार सत्तेवर येताच सर्व आमदारांना झेड सुरक्षा पुरवत आहे, असा टोला थोरात यांनी लगावला.

तपास यंत्रणांचा गैरवापर - सध्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकारणासाठी होतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख ( NCP Leader Anil Deshmukh ) देखील त्याचाच एक भाग आहेत. यापूर्वी संजय राऊत ( Shiv Sena Leader Sanjay Raut ) यांना देखील विनाकारण गोवण्यात आले. तपास यंत्रणाच्या गैरवापराचे दुष्परिणाम नक्कीच दिसून येतील, असे थोरात म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.