ETV Bharat / state

'मोदी सरकारला लाज कशी वाटत नाही' - काँग्रेस

'लाज कशी वाटत नाही' या टॅगलाईनला वापरून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मोदींनी दिलेल्या आश्वासनावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्या जाणार आहे.  या माध्यमातून आम्ही जनतेच्या मनातले प्रश्न सरकारला विचारणार आहोत, असे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

आघाडीकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद
author img

By

Published : Apr 2, 2019, 10:12 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणूकांच्या पहिला टप्प्याच्या मतदानाला एक आठवडा बाकी आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यात मग्न आहेत. भाजपकडून मै भी चौकीदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर त्याला प्रतिउत्तर द्यायला काँग्रेस राष्ट्रवादीकडून 'लाज कशी वाटत नाही' अशा टॅगलाईनची उपरोधिक टीका करणारी जाहीरात तयार करण्यात आली आहे.

आघाडीकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद

'लाज कशी वाटत नाही' या टॅगलाईनला वापरून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मोदींनी दिलेल्या आश्वासनावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्या जाणार आहे. या माध्यमातून आम्ही जनतेच्या मनातले प्रश्न सरकारला विचारणार आहोत, असे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

राज्यात आमचे कार्यकर्ते हे संयुक्तपणे प्रचार करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर यापुढे मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त पत्रकार परिषदा होत राहतील, जनतेच्या मनात निर्माण झालेले प्रश्न हे आम्ही 'लाज कशी वाटत नाही' माध्यमातून आणली असून प्रचारासाठी ती प्रभावी ठरणार असल्याचे नवाब मलिक यावेळी म्हणाले. 'लाज कशी वाटत नाही' या टॅग लाईनमध्ये बेरोजगार, शेतकरी, महिला सुरक्षा त्यासोबतच देशातील विविध प्रश्नांबद्दल मोदी सरकारचे अपयश दाखवण्यात येणार आहे. या अपयशावर आधारित प्रश्न उपस्थित करून सरकारला लाज कशी वाटत नाही असा सवाल करण्यात आला आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या दृकश्राव्य माध्यमाचा वापरही करण्यात आला आहे.

आजच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली असून त्यातल्या मुख्य मथळ्यात 'सामना'ने मोदी सरकारला उद्देशून दगा नही देना असे म्हटले आहे. त्यावर मलिक यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवत गुजरातमध्ये जाऊन मऊ ढोकळा खाऊन आलेले उद्धव ठाकरे. 'आज दगा नही देना' असे सांगत आहेत. यातून भाजप सेनेचे एकमेकांमध्ये जमत नाही, हे स्पष्ट झाले आहे. याच आधारे आम्ही आमच्या प्रत्येक सभेमध्ये दगा नही देना हिंदी गाणे वाजून लोकांमध्ये जनजागृती करणार असल्याचेही मलिक म्हणाले.

सोमवारी वर्धा येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला नवाब मलिकांनी आज प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, पवारांमुळे गुजरातमध्ये विकास झाला होता. हे मोदींनी एकेकाळी सांगितले होते. त्याचा एक दाखला देत पवार हे क्लीन बोल्ड करणारे नेते आहेत. ते मैदान सोडून जात नाहीत असे प्रत्युत्तर दिले. तर वर्ध्यात रिकाम्या खुर्च्या पाहून मोदी यांचा पारा चढला असावा म्हणूनच त्यांनी पवारांवर टीका केली. मात्र शेतकऱ्यांची पर्वा आम्हीच करतोय असा दावा करणाऱ्या मोदी-फडणवीस सरकारला या दरम्यान विदर्भात गारपीट झाल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे तिकडे एकही मंत्री फिरकला नाही अशी टीकाही त्यांनी केली.

Intro:काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोदींविरोधात 'लाज कशी वाटत नाही' ची टॅगलाईन

Body:काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोदींविरोधात 'लाज कशी वाटत नाही' ची टॅगलाईन

मुंबई, ता. २ :

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाही संयुक्तपणे प्रचार करण्यासाठी भाजप आणि मोदी सरकारच्या विरोधात 'लाज कशी वाटत नाही' ही टॅगलाईन तयार केली आहे. याला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळताच राज्यातील विविध माध्यमांमध्ये ती जाहिरातीच्या माध्यमातून वापरली जाणार आहे. तर प्रचारासाठी ही टॅगलाईन वापरून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मोदींना त्यांनी दिलेल्या आश्वासनावर प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत
'लाज कशी वाटत नाही' या टॅगलाईनसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रचार यंत्रणेसाठी विविध माध्यमांचा वापर करून त्यातून जनतेच्या मनातली बात या माध्यमातून आणली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक व काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले

राज्यात कार्यकर्ते हे संयुक्तपणे प्रचार करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर यापुढे मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त पत्रकार परिषदा होत राहतील, जनतेच्या मनात निर्माण झालेले प्रश्न हे आम्ही 'लाज कशी वाटत नाही' माध्यमातून आणली असून प्रचारासाठी ती प्रभावी ठरणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

'लाज कशी वाटत नाही' या टॅग लाईन मध्ये बेरोजगार, शेतकरी, महिला सुरक्षा त्यासोबतच देशातील विविध प्रश्नांबद्दल मोदी सरकारचे अपयश आणि त्यावर प्रश्न उपस्थित करून सरकारला लाज कशी वाटत नाही असा सवाल करण्यात आला आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या दृकश्राव्य माध्यमाचा वापरही करण्यात आला आहे. आजच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली असून त्यातल्या मुख्य मथळ्यात 'सामना'ने मोदी सरकारला उद्देशून दगा नही देना असे म्हटले आहे, त्यावर मलिक यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवत गुजरातमध्ये जाऊन मौज ढोकळा खाऊन आलेले उद्धव ठाकरे आज दगा नही देना असे सांगत आहेत त्यामुळे यांच्या एकमेकात जमत नाही हे स्पष्ट झाले असल्याने आम्ही ही याच गोष्टीचा आधार घेत राज्यातील प्रत्येक सभेमध्ये दगा नही देना हिंदी गाणे वाजून लोकांमध्ये जनजागृती करणार असल्याचेही मलिक म्हणाले

काल वर्धा येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याचा समाचार ही आज नवाब मलिक यांनी घेत पवारांमुळे गुजरातमध्ये विकास झाला होता हे मोदी ने एकेकाळी सांगितले होते. त्याचा एक दाखला देत पवार हे क्लीन बोल्ड करणारे नेते आहेत ते मैदान सोडून जात नाहीत असे प्रत्युत्तर दिले.तर वर्ध्यात रिकाम्या खुर्च्या पाहून मोदी यांचा पारा चढला असावा म्हणूनच त्यांनी पवारांवर टीका केली मात्र शेतकऱ्यांची पर्वा आम्हीच करतोय असा दावा करणाऱ्या मोदी-फडणवीस सरकारला या दरम्यान विदर्भात गारपीट झाल्याचे लक्षात आले नाही त्यामुळे तिकडे एकही मंत्री फरक नाही अशी टीकाही त्यांनी केली.

Conclusion:काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोदींविरोधात 'लाज कशी वाटत नाही' ची टॅगलाईन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.