ETV Bharat / state

संजय निरुपम यांची कन्या पहिल्यांदाच बजावणार मतदानाचा हक्क - उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम

पहिल्यांदा मतदान करणार याची उत्सुकता आहेच. मात्र, उमेदवाराने निवडून आल्यावर नेहमी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असायला पाहिजे. मुंबईत दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूककोंडी, प्रदूषण, मेट्रोच्या कामासाठी आरेसारख्या हरितपट्टा असलेला भागाचा प्रश्न उमेदवाराने प्राधान्याने सोडवावे, असे शिवानी म्हणाली.

संजय निरुपम यांची कन्या शिवानी निरुपम
author img

By

Published : Apr 9, 2019, 10:32 PM IST

Updated : Apr 10, 2019, 12:05 AM IST

मुंबई - उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांची एकुलती एक कन्या शिवानी निरुपम यंदा पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. संजय निरुपम यांच्यासोबत ती प्रचार फेऱ्यांमध्येही सहभागी असते. शिवानीला तरुण मतदार म्हणून आपल्या उमेदवाराविषयी काय वाटते? या विषयी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने तिच्याशी केलेली चर्चा.

संजय निरुपम यांच्या कन्येसोबत चर्चा करताना ईटीव्ही भारतचे प्रतिनीधी

पहिल्यांदा मतदान करणार याची उत्सुकता आहेच. मात्र, उमेदवाराने निवडून आल्यावर नेहमी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असायला पाहिजे. मुंबईत दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूककोंडी, प्रदूषण, मेट्रोच्या कामासाठी आरेसारख्या हरितपट्टा असलेला भागाचा प्रश्न उमेदवाराने प्राधान्याने सोडवावे, असे शिवानी म्हणाली.

शिवानी राहत असलेल्या मतदारसंघातूनच संजय निरुपम निवडणूक लढवत आहे. त्यामुळे त्यांना तरुणांनी का पाठींबा द्यावा? असे विचारले असता, माझे बाबा संजय निरुपम हे सत्तेत नसतानाही त्यांनी वाढत्या वीज दराचा प्रश्न उचलून धरला. तसेच अनेक तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच ते निवडून आल्यास पुर्णतः नेहमी प्रमाणे जनतेच्या सेवेत वाहून घेतील, असे ती म्हणाली. तसेच मी त्यांच्या प्रचारात सहभागी असते. मात्र, राजकारणात येणार नसल्याचे शिवानीने यावेळी स्पष्ट केले.

Intro:उत्तर पश्चिम लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांची एकुलती एक कन्या शिवानी निरुपम ही यंदा पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. लक्झरी ब्रांड मॅनेजमेंटमध्ये शिवानी उच्च पदवीचे शिक्षण घेतेय. उमेदवार असलेल्या संजय निरुपम यांच्यासोबत प्रचार फेऱ्यांमध्येही ती सहभागी असते. शिवानीला तरुण मतदार म्हणून नेमकं आपल्या उमेदवाराविषयी काय वाटतं या विषयी ई टीव्ही भारतशी तिने केलेली बातचीत.

Body:मी पहिल्यांदा मतदान करणार याची उत्सुकता आहेच. मात्र आपला उमेदवार निवडून आल्यावर नेहमी सतत लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असलं पाहिजे असे शिवानीला वाटते.
मुंबईत दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूककोंडी, प्रदूषण,मेट्रोच्या कामासाठी आरे सारख्या हरितपट्टा असलेला भागाचा प्रश्न उमेदवाराने प्राधान्याने सोडवावे असे शिवानी म्हणाली.

Conclusion:उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात काँग्रेसच्या वतीने युवकांसाठी प्रसिध्द करण्यात आलेला जाहीरनामा हा तरुणांना डोळ्यासमोर ठेवून योग्यच बनवत आला असल्याचे शिवानीचे म्हणणे आहे.
शिवानी राहत असलेल्या मतदारसंघातूनच संजय निरुपम हे निवडणूक लढवत आहे, त्यामुळे त्यांना तरुणांनी का पाठींबा द्यावा असे वाटते असे तिला विचारले असता, माझे बाबा संजय निरुपम हे सत्तेत नसतानाही त्यांनी वाढत्या वीज दराचा प्रश्न उचलून धरला. तसेच अनेक तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच ते निवडून आल्यास पुर्णतः नेहमी प्रमाणे जनतेच्या सेवेत वाहून घेतील. मी त्यांच्या प्रचारात सहभागी असते, मात्र राजकारणात येणार नसल्याचे शिवानीने स्पष्ट केले.
Last Updated : Apr 10, 2019, 12:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.