ETV Bharat / state

Fire Brigade Recruitment : महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान गोंधळ; पोलिसांसोबतही तरुणींची झाली बाचाबाची, सौम्य लाठीचार्ज

मुंबईतील दहिसर पश्चिम दिवंगत गोपीनाथ मुंडे मैदानावर महिला अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांची भरती सुरू होती. जिथे रात्रीपासून महिला जमा झाल्या होत्या आणि त्याच ठिकाणी भरतीची तयारी करत होत्या. मात्र, सकाळी मुलींना गेटमधून आत जाऊ दिले नाही. त्यानंतर मुलींनी बीएमसी हाय हायच्या घोषणा देण्यास सुरुवात केली आहे. घोषणाबाजी दरम्यान पोलीस आणि तरुणींमध्ये बाचाबाची झाली. मुलींवर सौम्य लाठीचार्जही करण्यात आला.

author img

By

Published : Feb 4, 2023, 2:12 PM IST

Updated : Feb 4, 2023, 5:03 PM IST

Fire Brigade Recruitment
महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान गोंधळ

मुंबई : मुंबई अग्निशमन दलाची भरती रद्द करण्याची मागणी महिला भरती उमेदवारांकडून केली जात आहे. मुंबईतील दहिसरमध्ये मुंबई अग्निशमन दलात भरतीसाठी आलेल्या महिला आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी विविध आरोप केले आहेत. ज्या मुलींची उंची चांगली आहे, त्यांनाही प्रवेश दिला जात नाही. मुंबई फायर ब्रिगेड भरतीसाठी पात्र असून आणि पात्रता पूर्ण करूनही त्यांना संधी दिली जात नसल्याचे मुलींचे म्हणणे आहे. एकूण 910 फायरमन पदांची भरती होणार आहे. खरं तर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग भरती मंडळामध्ये एकूण ९१० पदांसाठी अग्निशमन दलाची भरती केली होती.

  • Mumbai, Maharashtra| 3318 women candidates, who were qualified as per height criteria were chosen for further selection process. Protesting women are those who came late. We can’t allow people who reached around 10 am when time was 8 am: Chief Officer, Mumbai Fire Brigade pic.twitter.com/paK4H8Ky7l

    — ANI (@ANI) February 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गोपीनाथ मुंडे मैदानावर भरती : मुंबईतील दहिसर पश्चिम दिवंगत गोपीनाथ मुंडे मैदानावर मुली अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांची भरती सुरू होती. रात्रीपासून महिला जमा झाल्या होत्या. त्याच ठिकाणी भरतीची तयारी करत होत्या. मात्र सकाळी मुलींना गेटमधून आत जाऊ दिले गेले नाही. त्यानंतर मुलींनी बीएमसी हाय-हायच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. घोषणाबाजीदरम्यान पोलीस आणि तरुणींमध्ये बाचाबाची झाली. मुलींवर लाठीचार्जही करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रातून मुली जमल्या : संपूर्ण महाराष्ट्रातून या मुली जमल्या होत्या. मैदानात प्रवेश न मिळाल्याने मुलींनी मैदानाचे दुभाजक ओलांडून आत प्रवेश केला. उपस्थित मुलींकडून मुंबई अग्निशमन दलाची भरती रद्द करण्याची मागणी केली जात आहे. खरं तर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग (अग्निशमन विभाग) भरती मंडळ, मुंबईने डिसेंबर २०२२ मध्ये एकूण ९१० पदांसाठी अग्निशमन दलाची भरती केली होती. पात्र उमेदवारांना mahafireservice.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. यानंतर, अर्जदारांना 13 ते 31 डिसेंबर आणि 1 ते 4 फेब्रुवारी 2023 या कालावधीत बायोडेटा आणि शैक्षणिक कागदपत्रांसह वॉक इन सिलेक्शनला उपस्थित राहावे लागले. असे सांगण्यात आले आहे.

मुंबई फायरमन भरती रद्द करण्याची मागणी : दोन-तीन दिवसांपासून आम्ही भरतीसाठी लांबून आलो आहोत. तरीही आम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जात नसल्याचे मुलींचे म्हणणे आहे. अग्निशमन दलाच्या भरतीत अनेक आरोप करत या तरुणी अग्निशमन दलातील भरती रद्द करण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा : Kasba And Pimpri Chinchwad Polls: कसबा, पिंपरी चिंचवड निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

Last Updated : Feb 4, 2023, 5:03 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.