मुंबई - राज्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडवली असून शेतीचे मोठे नुकसान ( Loss of farmers due to return rains ) झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे ( Panchnama ) करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी दिले आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल. ( Help to farmers before Diwali ) असे नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान - गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आहे आहेत. त्यात दिवाळी तोंडावर आल्याने करायचे काय, या विवेचनेत शेतकरी आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पावसामुळे अगदी बुधवारपर्यंत झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी असे, आदेश मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
परतीच्या पावसाचा फटका - अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.