मुंबई - राज्यात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने पाऊस पडतो आहे या पावसामुळे संत्रा पिकाचे तसेच अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीकाऱ्यांची भरपाई राज्य सरकारकडून मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार - दरम्यान, या संदर्भात राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना विचारले असता पाऊस साधारण किती दिवस पडला आहे कोण कोणत्या भागात पडला आहे याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे या पावसामुळे कोणत्या ठिकाणी किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे याचा आढावा घेऊन त्यानुसार पंचनामे केली जातील आणि या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई राज्य शासनाच्या वतीने दिली जाईल अशी ग्वाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.Conclusion: