मुंबई: कुलाबा पोलिस आज फोन टॅपिंग प्रकरणात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांचा जबाब नोंदवणार आहेत. बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणात राऊत यांचा जबाब नोंदवण्यासाठी राऊत कुलाबा पोलिस ठाण्यात हजर होणार नाहीत. संबधित तपास अधिकारी राऊत यांनी दिलेल्या ठिकाणी जाऊन जबाब नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अवैधरीत्या फोन टॅपिंग केल्याचे समोर आले पोलीसांनी त्यांचाही दोन वेळा जवाब नोंदवला आहे. फोन टॅपिंग प्रकरण समोर आल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये संतापाची लाट आली होती. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात 500 कोटींचा मानहाणीच दावा दाखल करणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलेला आहे.