मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कोकेन पावडर जप्त करत, एका भारतीय प्रवाशाला अटक केली. डीआरआय अधिकाऱ्याने 1,496 ग्रॅम कोकेन या अमली पदार्थाची पांढरी पावडर जप्त केली आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाची अंदाजे 15 कोटी रुपये किंमत असल्याची माहिती डीआरआयच्या सूत्रांनी दिली आहे.
कोकेन जप्तीची कारवाई : डीआरआय अधिकाऱ्यांनी 15 कोटी रुपयांचे 1.5 किलो कोकेन जप्त केले आहे. डीआरआयने नायजेरियातील सॉल्टी थॉमस आणि युगांडाचा नागरिक असलेला नकिरिज्जा एलिस या दोघांना अटक केली आहे. ड्रग्ज सिंडिकेट चालवणाऱ्या आणखी किमान दोन नायजेरियन नागरिकांचा डीआरआयचे अधिकारी शोध घेत आहेत. डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, आदिस अबाबाहून मुंबईला आलेल्या फ्लाइटमधून आलेल्या प्रवाशाला शुक्रवारी पकडण्यात आले होते. नंतर डीआरआय अधिकार्यांनी सापळा रचून प्राप्तकर्त्याला पकडले, जो नवी मुंबई येथे अमली पदार्थ घेण्यासाठी आला होता. पकडलेली प्राप्तकर्ता महिला युगांडाची नागरिक आहे, असे डीआरआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अमली पदार्थ केले जप्त : वाहक आणि प्राप्तकर्ता या दोघांना नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, ड्रग्ज पुरवठा साखळीशी आणखी दुवे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. स्वतंत्रपणे, मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने काल दोन अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे 38 लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते. अटक आरोपीना न्यायालयात हजर केले असता 22 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोकेन ड्रग्जची किंमत जवळपास 15 कोटी : डीआरआयने रविवारी सांगितले की, गुप्तचर माहितीच्या आधारे 44 वर्षीय सॉल्टी थॉमस, केरळचा रहिवासी, जो आदिस अबाबाहून मुंबईला जाणाऱ्या ईटी 640 फ्लाइटने मुंबईला आला होता. त्याला शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले. त्याच्या सामानाची झडती घेतली असता 1,496 ग्रॅम पांढरी पावडर जप्त करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जप्त केलेली पांढरी पवडर ही कोकेन ड्रग्ज आहे. ज्याची बाजारात किंमत जवळपास 15 कोटी आहे.
तस्करांना न्यायालयात हजर : अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिला तस्करांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. जिथे त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोन्याच्या तस्करीत महिला पॅडलर्सचा वापर केला जातो. मात्र या प्रकरणात तस्कर आणि त्याचा हँडलर म्हणजेच रिसिव्हर दोन्ही महिला असल्याचे समोर आले आहे. आता एजन्सीने त्यांच्याशी संबंधित इतर प्रकरणांचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा -