मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. युती तोडल्याच्या कारणावरून बोलताना त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. बंद दाराआड झालेली चर्चा बाहेर जाऊन त्यांनी वेगळ्याच प्रकारे सांगितली, असे ते म्हणाले. कोरोना केंद्रामध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप नाकारत महाराष्ट्राने कोरोनाची लढाई समर्थपणे लढली, आम्ही केले ते सर्व शून्य आहे, असे समजू नका, असे ते म्हणाले.
शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये
हिंदु धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीला आम्ही अटक केल्याशिवाय राहणार नाही. बाबरी पाडली त्यावेळी येडीगबाळी पळून गेली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख ठामपणे उभे होते. काश्मिरातील पंडितांना त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.
काय म्हणाले मुख्यमंत्री
- महाराष्ट्राने कोरोनाची लढाई समर्थपणे लढली, आम्ही केले ते सर्व शून्य आहे, असे समजू नका.
- आरे हा विषय खूप महत्त्वाचा आहे, त्यावर विरोधकांनी आमच्याशी एकत्र येवून चर्चा व्हायला हवी, कदाचित आपल्या सर्वांना पुढे एकत्र काम करायचे आहे.
- मेट्रोला स्थगिती दिली जाणार नाही, आरे कारशेड भविष्यात कमी पडू नये. राज्यात मोठी गुंतवणूक आणली.
- शरजील उस्मानीला आम्ही अटक केल्याशिवाय राहणार नाही.
- बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत (अमित शाहंनी) निर्लजपणे तुम्ही दिलेला शब्द तोडला. बाहेर जाऊन दुसरेच बोलले गेले.
- बाबरी पाडली त्यावेळी येडीगबाळी पळून गेली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख ठामपणे उभे होते. शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये. काश्मिरातील पंडितांना त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.
- देश ही कोणाची खासगी मालमत्ता नाही, विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होणार नाही मी तो होऊ देणार नाही.
- संघ मुक्त भारत करणाऱ्या नितीश कुमारांना तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचावे लागतेय.
- शेतकऱ्यांचाही हा देश आहे. त्यांच्या आंदोलन ठिकाणी तुम्ही खिळे टाकता, कुंपन घालता, सीमेवर हवे असणारे कुंपन शेतकऱ्यांच्या समोर घातले जाते. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नका.
लसीकरणासाठी जास्तीत-जास्त रुग्णालये निवडली गेली पाहिजेत. लसीकरण वाढवण्याची गरज आहे, कोविन अॅपमध्ये गडबड आहे, मात्र त्यावरून केंद्रावर टीका करणे योग्य नाही. काही तरी नवीन करताना अशा समस्या येऊ शकतात.
- कोरोनाची लाट रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठीची यंत्रणा आता थोडी थकली आहे. टाळेबंदी नको असल्यास सर्वांनी मास्क, हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे ही त्रिसुत्री वापरली पाहिजे.
- संसर्गाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदीची गरज आहे. आम्हाला व्यापाऱ्यांची चिंता आहे. कुणी मला विलन ठरवले तरी काही अवघड निर्णय घ्यावा लागेल. एखाद्या वर्गासाठी सर्व जनतेला त्रास देऊ शकत नाही. कोरोनावर कुणी राजकारण करू नका.
- कोविड काळात जे काही केले, ते त्या-त्या वेळी लाईव्हवरून माहिती दिली आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेतून मोठ्या प्रमाणात रुग्णांना सामावून घेतले आहे.
- कोरोना रुग्णसंख्या अजिबात लपवली नाही, सर्व मृत्यूंची नोंद केली, बंद दारा आडही आम्ही कधी खोटे बोललो नाही.
- कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी रेल्वे व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही केंद्राला आठ दिवसांपूर्वी मागणी केली होती. त्यानंतर टाळेबंदी लागली.
- मराठी भाषेला अभिजात दर्जा का नाही
- स्वातंत्र्यवीर सावरकरांना अजून भारतरत्न का दिला गेला नाही
- पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून मुख्यमंत्र्यांची केंद्रावर टीका.