ETV Bharat / state

कोरोनाचे नियम पाळून उद्योग चालू ठेवा; मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन - CM Uddhav Thackeray on corona

स्थानिक पातळीवर निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेतील अशी माहिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत दिली आहे.

कोरोनाचे नियम पाळून उद्योग चालू ठेवा; मुख्यमंत्र्याचे उद्योजकांना आवाहन

author img

By

Published : Jun 6, 2021, 7:12 PM IST

मुंबई - कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे. आपल्याला लॉकडाऊन आणि अनलॉक हे दोन्ही नकोत. त्यामुळे आरोग्याचे नियम पाळत राहा. आपण रिस्क घेत आहोत अनलॉक करताना. त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथील केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. स्थानिक पातळीवर निर्बंध किती शिथील करायचे किंवा कडक याबाबत स्थानिक प्रशासनाकडून निर्णय घेतला जाईल अशी माहिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत दिली आहे.

मोठ्या कंपन्यांचे सहकार्य लाभले -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील उद्योजकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात उद्योग सुरु करण्याच्या भूमिकांवर उद्योजकांसोबत चर्चा केली आहे. तसेच उद्योजकांना संबोधताना मुख्यमंत्री म्हणाले की, साप भी मरे और लाठी भी ना टुटे असे आपल्याला कोरोना काळात वागावे लागेल. युकेतील विषाणू सारखे किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला आहे. गेल्या वर्षभरात सुविधा वाढवल्या. साडे तीन लाख बेड्स वरून साडे चार लाख बेड्स पर्यंत पोहचलो. प्रयोगशाळा वाढल्या आहेत. कोविड केअर केंद्रे वाढवली आहेत. पण दुसऱ्या लाटेत आपल्याला काही सुविधा अपुऱ्या पडतील की काय अशी भिती होती. ऑक्सिजनचा तुटवडा झाला पण सर्व मोठ्या कंपन्यांनी आम्हाला ऑक्सिजन उपलब्धतेसाठी सहकार्य केले.

आरोग्याचे नियम पाळावेत -
बांधकाम कामगार तसेच राज्यातील इतर उद्योगांमध्ये बाहेरील राज्यातील जे कामगार काम करीत आहेत, त्यांची आरोग्य विषयक नोंद व्यवस्थित ठेवा. त्यांनी त्यांच्या राज्यात जाताना आणि तिकडून येताना कोविडचा विषाणू पसरवू नयेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखील माहिती ठेवा. कामगार परराज्यातून आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवावे, त्यांची तपासणी करावी, पावसाची सुरुवात होते आहे. त्यामुळे रोगराई वाढू शकते, साथीचे रोग पसरतात. आपल्या कामगार आणि कर्मचारी यांना आरोग्याचे नियम पाळतील असे पहा. आरोग्य तपासण्या कराव्याचा सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे.

उद्योजकांना सूचना -
पूर्वी जसे सार्वजनिक ठिकाणी किंवा इतरत्र सर्रास धुम्रपान केले जात असे पण आज असे सार्वजनिक ठिकाणी कुणी धुम्रपान करताना दिसत नाही. केवळ कायद्याचा बडगा नाही तर आता ती आपल्याला सवय लागली आहे. तसेच मास्क लावण्याच्या बाबतीत आपण सवय लावावी. येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट आली आणि आणि लॉकडाऊन करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर, उत्पादनावर परिणाम झाला नाही पाहिजे. आपण जसे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना दिले आहे.

हे उद्योजक होते उपस्थितीत-
या बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, संजीव बजाज, बी थियागराजन, डॉ नौशाद फोर्बस, अमित कल्याणी, अशोक हिंदुजा, ए एन सुब्रमनियन, डॉ अनिश शहा, अजय पिरामल, बनमाली अग्रवाल, हर्ष गोयंका, सुनील माथुर, उज्वल माथुर, संजीव सिंग, बोमन इराणी, निरंजन हिरानंदानी, जेन करकेडा, असीम चरनिया, सुलज्जा फिरोदिया सहभागी. याशिवाय टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी अनबलगन आदि उपस्थित होतेेेे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.