मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीतील पक्षाचे ज्येष्ठ नेते देखील उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांनी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात झालेली विकास कामे, त्या विकास कामांना दिलेला निधी आणि या सोबतच रखडलेली विकासकामे याचा आढावा या बैठकीतून घेतला जाणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता विभागवार ही बैठक होणार असून पुढचे दोन दिवस या बैठकी सुरू राहणार आहेत. महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी मिटिंग म्हणून याकडे पाहिले जात आहे.
वाढत्या कोरोनाचा बैठकीत घेणार आढावा
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चर्चेसोबतच कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्याचा देखील मुख्यमंत्री या बैठकीत घेणार आढावा घेणार आहेत. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यासंबंधीही चर्चा या बैठकीत केली जाणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यभर आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा राज्यात काही ठिकाणी लॉक डाऊन होण्याची भीती आहे. सोबतच मुंबईतील लोकलच्या वेळांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्याबाबतची चर्चा या बैठकीत केली जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीतील आमदारांसोबत बैठक - cm-uddhav-thackeray-meeting-with--maha-vikas-aghadi- all mla
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चर्चेसोबतच कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्याचा देखील मुख्यमंत्री या बैठकीत घेणार आढावा घेणार आहेत. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यासंबंधीही चर्चा या बैठकीत केली जाणार असल्याची माहिती आहे.
![मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीतील आमदारांसोबत बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10651576-366-10651576-1613478628958.jpg?imwidth=3840)