ETV Bharat / state

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी

author img

By

Published : Oct 6, 2020, 5:17 PM IST

Updated : Oct 6, 2020, 8:05 PM IST

राज्य सरकारतर्फे "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" ही मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह परिवारातील इतर सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

cm-uddhav-thackeray-corona-test-under-maze-kutumba-mazi-jababdari-campaign
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत मुख्यमंत्र्यांनी केली आरोग्य तपासणी

मुंबई- राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारतर्फे "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आज (मंगळवार) सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व प्रभागातील आरोग्य पथकाने त्यांच्या वांद्रे पूर्व येथील मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह परिवारातील इतर सदस्यांची आरोग्य तपासणी केली.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत मुख्यमंत्र्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या मोहिमेंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात आठ कोटींपेक्षा जास्त लोकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व कुटुंबांना सुरक्षित ठेवणारी ही मोहीम केवळ शासकीय नसून लोकचळवळ असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.

अशी आहे "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" ही मोहीम -

या मोहीमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होत असून या मोहीमेंतर्गत आशा स्वयंसेविका तसेच वैद्यकीय सहाय्यकांद्वारे घरोघर जाऊन आरोग्य चौकशी करण्यात येत आहे. तर दुसरा टप्पा हा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहे. पहिल्या फेरीचा कालावधी २२ दिवसांचा, तर दुसरा १२ दिवसांचा असेल. यात घरातील कुटुंबांच्या आरोग्याविषयी जाणून घेतले जाईल. त्यांना हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा यासारखे इतर कोणते आजार आहेत का, याची माहीती घेण्यात येणार आहे.

Last Updated : Oct 6, 2020, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.