मुंबई - इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. स्मारकाच्या पायाभरणीच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग गरजेचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटले आहे. सर्वांच्या सहभागाने येत्या काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार असून राजकराण करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्यानंतर एमएमआरडीएने पायाभरणी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सर्व मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत पायाभरणी कार्यक्रम करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पायाभरणीचा आज होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून मोठा वाद सुरू झाला होता. यावर आंबेडकर कुटुंबानेही नाराजी व्यक्त केली होती. कार्यक्रमाला शेवटी अवघे काही तास उरले असताना हा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) आली होती. या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमावरून राजकारण करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा-डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा आजचा पायाभरणीचा कार्यक्रम रद्द