ETV Bharat / state

CM Shinde On Opposition: "मला सुद्धा रोज बाउन्सर येतात, पण मी सचिनचं नाव घेऊन जोरदार बॅटिंग करतो"; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

CM Shinde On Opposition: सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची मला रोज आठवण येते. रोज सकाळी मला विरोधक बाउन्सर टाकणार की सरपटी, या विचारात असतो. पण सचिनचे नाव घेऊन मी रोज बॅटिंग करतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या भव्य पुतळ्याचे आज (बुधवारी) मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

CM Shinde On Opposition
मुख्यमंत्री शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 11:02 PM IST

मुख्यमंत्री शिंदे सचिन तेंडुलकरविषयी बोलताना

मुंबई CM Shinde On Opposition: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सचिन तेंडुलकर यांचा हा २२ फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. (Sachin Tendulkar Statue Unveiled) सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा तयार केला आहे. (Wankhede Stadium) ढोल ताशांच्या गजरात या पुतळ्याचे दिमाखात अनावरण झाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सेक्रटरी जय शाह, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे, सचिव अजिंक्य नाईक, आशिष शेलार तसेच सचिन तेंडुलकरसह त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.

जिवंतपणी सचिनचा हुबेहूब पुतळा: वानखेडे स्टेडियमवर जिवंतपणी सचिनचा हुबेहूब पुतळा बनविला आहे. दुसरा सचिन होणार नाही असे बोललं जात होतं; मात्र प्रमोद कांबळेंनी दुसरा सचिन बनवला आहे. याचा अभिमान वाटतो. क्रिकेटपटूंसाठी हा पुतळा प्रेरणादायी ठरेल. भारताने सचिन हे जगाला बहाल केलेलं मूर्तिमंत आश्चर्य आहे. सचिन हा महाराष्ट्रीयन आहे याचा आम्हाला अभिमान आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सचिन तेंडुलकर यांचे आभारच: सचिनच्या बॅट मधून होणारे चौकार, षटकार अनुभवले की आपली दिवसभराची मरगळ झटकली जाते. मन प्रसन्न होतं. लता दिदींच्या स्वरांनीही आपलं मन असंच प्रसन्न होतं. लता दिदींनीही सचिन यांच्या बॅटींगवर भरभरून प्रेम केलं. लता दिदींचे स्वर आणि सचिनच्या बॅटमधून निघणाऱ्या धावांचा वर्षाव या दोन्ही गोष्टी अजरामर आहेत. जगाच्या अंतापर्यंत राहणाऱ्या आहेत. जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींचे विश्व समृध्द केल्याबद्दल भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचं आभारच मानायला हवं, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संघर्षातून विजयाचे सचिन प्रतिक: संघर्षातून विजय कसा मिळवावा याचं मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर हे प्रतिक आहेत. त्यांचा पुतळा उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत ठरेल,' असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. आज आपल्या आयुष्यातील मास्टर ब्लास्टर क्षण आहे. माझ्या रोजच्या कामात आजचा कार्यक्रम आनंद देणारा आहे. सचिनच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं मला भाग्य मिळालं. आज दोन मास्टर ब्लास्टर आहेत. सचिन यांचा एकेरी उल्लेख करायला अवघड जाते. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्याला एकरी उल्लेख करतो, देवाचा देखील ऐकरी उल्लेख करतो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

'हा' पुतळा ध्येय गाठण्यासाठी ऊर्जा देणारा: याच मैदानावर सचिनने शेवटचा सामना खेळला होता आणि याच मैदानावर भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. हा पुतळा प्रमोद कांबळे यांनी बनविला त्यांचं देखील कौतुक वाटते. सचिन हा क्रिकेटचा देव आहे. त्यांनी आपलं करिअर याच मैदानातून सुरू केलं आणि याच मैदानात कारकीर्दीमधील अखेरच्या बॉलचा सामना केला. भारत विश्र्वचषकाचा विजेता बनावा हे सचिनचं स्वप्न याच स्टेडियमवर पूर्ण झालं आहे. सचिन तेंडुलकर या नावात स्फूर्ती आहे. संघर्षातून विजय कसा मिळवावा याचं सचिन प्रतिक आहेत. हा पुतळा तरुणांना आपलं ध्येय गाठण्यासाठी मोठी ऊर्जा देणारा आणि क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल. सचिन हा भारताने जगाला बहाल केलेला चमत्कार आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले.

हेही वाचा:

  1. Sachin Tendulkar Statue : क्रिकेटचा देव वानखेडेवर अवतरला, सचिनच्या २२ फूट उंच पुतळ्याचं अनावरण
  2. Sachin Tendulkar Statue : उद्घाटनापूर्वीच पाहा वानखेडे स्टेडियमवरील सचिनचा पुतळा
  3. Sachin Tendulkar: 50 छोट्या क्रिकेटपटूंना क्रिकेट किटचे वाटप; जेव्हा सचिन गुगली शिकवतो...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.