ETV Bharat / state

एमएमआर क्षेत्रातील प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करा - मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्यूज

मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक मेट्रो प्रकल्पांच्या कामांची सद्यस्थिती, भविष्यातील नियोजन, निधीची उपलब्धता यासर्व बाबींवर वर्षा निवासस्थातील समिती कक्षात बैठक पार पडली. या बैठकीत पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

cm noticed to officials to complete mmr project in time
एमएमआर क्षेत्रातील प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करा - मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
author img

By

Published : Jun 18, 2021, 9:20 PM IST

मुंबई - मुंबई शहरासह महानगर परिसरातील दळणवळणासाठी महत्वपूर्ण असलेले प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्रवारी (दि. १८ जून) प्रशासनाला दिल्या. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक मेट्रो प्रकल्पांच्या कामांची सद्यस्थिती, भविष्यातील नियोजन, निधीची उपलब्धता यासर्व बाबींवर वर्षा निवासस्थातील समिती कक्षात बैठक पार पडली. या बैठकीत पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

'हे' होते उपस्थित

या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन, महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते यावेळी 'एमएमआर रिजनल प्लान' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

पावसाचे पाणी साचू देऊ नका

एमटीएचएल प्रकल्पाचे सुमारे ३५ ते ४० टक्के काम पूर्ण झाले असून सप्टेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सादरीकरणा दरम्यान सांगण्यात आले. मुंबईतील सुमारे १४ मेट्रो लाईन्स प्रकल्पाद्वारे ३३७ कि.मी. मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. मुंबईत मेट्रोची कामे अनेक ठिकाणे सुरू असून कामाच्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाचे पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मेट्रो कामांचे सादरीकरण

एमयुटीपी ३ ए प्रकल्पांतर्गत उपनगरीय रेल्वे सेवांचा विस्तार, उपनगरीय स्थानकांचे आधुनिकीकरण आदी कामांचा समावेश असल्याचे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक खुराणा यांनी सांगितले. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत यांनी पुणे, नागपूर आणि नाशिक मेट्रोबाबत सादरीकरण केले.

हेही वाचा - निर्माता रमेश तौरानी यांची फसवणूक, त्यांच्या ३५६ कर्मचाऱ्यांना दिले ‘फेक वॅक्सीन’?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.