औरंगाबाद - शहरासाठी नव्या पाणी योजनेला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. त्यासाठी 1680 कोटी रूपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती राज्यमंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नव्या पाणी योजने अंतर्गत जायकवाडी धरणातून 1100 किलो मीटर लांबीच्या पाच नव्या पाईप लाईन टाकण्यात येणार आहेत. शहरात पाणीसाठ्यासाठी 52 ठिकाणी पाण्याच्या नवीन टाक्यांचे बांधकाम होणार आहे.
औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणामधून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, या धरणातून होणारा पाणी पुरवठा शहरासाठी अपुरा पडतो. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जातो. परिणामी नागरिकांचे पाण्यासाठी हाल होतात.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे गेल्या दोन वर्षांपासून नवी पाणी योजना देण्यासाठी पाठपुरावठा केला. आज (मंगळवार) मुख्यमंत्र्यांनी 1680 कोटींची पाणी योजना मंजूर केली. औरंगाबादची 2052 पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेता ही योजना तयार केल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली.