ETV Bharat / state

मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी नवा कायदा - मुख्यमंत्री - इमारत दुर्घटना

डोंगरी येथील इमारत दुर्घटनेमुळे दक्षिण मुंबईतल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

धोकादायक इमारतींबाबत पार पडलेली बैठक
author img

By

Published : Jul 17, 2019, 5:38 PM IST

Updated : Jul 17, 2019, 6:46 PM IST

मुंबई - जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा क्लस्टर पद्धतीने विकास करण्यासाठी नवा कायदा करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईतील धोकादायक इमारतींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचे क्लस्टर करावे. तसेच पुर्नविकासातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वंकष कायदा करण्याबाबतचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अशा इमारतींचा पुर्नविकास म्हाडाच्या माध्यमातून करणे. तसेच सध्या जे रहिवासी अशा इमारतीत राहत आहेत. त्यांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करणे. तसे न करता आल्यास दोन वर्षांचे भाडे देणे. तसेच रिट ज्युरिडिक्शनच्या मूळ कायद्याला न वगळता अन्य कायदेविषयक गतिरोध दूर करणे, अशा ठोस तरतुदी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

धोकादायक इमारतींचा क्लस्टर पद्धतीने विकास करताना इमारतीतील रहिवाशांसाठी पर्यायी निवासाची सोय करावी. मुंबईतील विविध योजनांमधील तसेच झोपडपट्टी पुर्नविकास, ट्रान्झिट कॅम्प या विविध योजनेतून घरे उपलब्ध असतील तर त्यांची यादी करावी. त्याठिकाणी या रहिवाशांची व्यवस्था करावी, असे देखील मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.

विकासकाने हलगर्जी केल्यास म्हाडाच्या माध्यमातून इमारतींचा विकास करा -

म्हाडाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत शहरात सध्या 14 हजार 785 इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. तसेच धोकादायक आहेत. मात्र, इमारती मधील लोक इमारत रिकामी करण्यास सहजा सहजी तयार होत नाहीत. अनेकदा इमारत मालक आणि भाडेकरू यांच्यातही वाद निर्माण झाल्याने पुनर्विकास रखडतो. तर पुनर्विकासकाच्या चालढकल भूमिकेमुळे ही रहिवाश्यांनी आपला जीव मुठीत राहून राहावे लागत आहे. विकासक हलगर्जीपणा दाखवत असेल अशा ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून पूर्णपणे विकास करावा, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुंबईतील अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतींचा सर्व्हे करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या बैठकीस गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार अमीन पटेल, विनोद घोसाळकर तसेच मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यावेळी उपस्थित होते.

Intro:मुंबईतील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार

-मुख्यमंत्री

मुंबई 17

डोंगरी येथील इमारत दुर्घटनेमुळे दक्षिण मुंबईतल्या जुन्या आणि मोडकळीला आलेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. जुन्या आणि मोडकळीला आलेल्या इमारतींचा क्लस्टर पद्धतीने विकास करण्यासाठी नवा कायदा करू असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. डोंगरी इथक्या केसरबाई इमारत कोसल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईतील धोकादायक इमारतीं बाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

मुंबईतील मोडकळीला आलेल्या इमारत इमारतींचे क्लस्टर करून तसेच पुर्नविकासातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वंकष कायदा करण्याबाबतचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अशा इमारतींचा पुर्नविकास म्हाडाच्या माध्यमातून करतानाचा सध्या जे रहिवाशी अशा इमारतीत राहताहेत त्यांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करणे तसेच तसे न करता आल्यास दोन वर्षांचे भाडे देणे तसेच रिट ज्युरिडिक्शनच्या मूळ कायद्याला न वगळता अन्य कायदेविषयक गतिरोध दूर करणे अशा ठोस तरतुदी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
धोकादायक इमारतींचा क्लस्टर पद्धतीने विकास करताना इमारतीतील रहिवाशांसाठी पर्यायी निवासाची सोय करावी. मुंबईतील विविध योजनांमधील तसेच झोपडपट्टी पुर्नविकास, ट्रान्झिट कॅम्प या विविध योजनेतून घरे उपलब्ध असतील त्यांची यादी करावी आणि तेथे या रहिवाशांची व्यवस्था करावी, असे ही मुख्यमंत्र्यांनी उपस्तिथ अधिकाऱ्यांना सांगितले.
म्हाडाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार मुंबईत शहरात सध्या 14 हजार 785 इमारती मोडकळीला आलेल्या आणि धोकादायक आहेत. मात्र इमारती मधील लोक इमारत रिकामी करण्यास सहजा सहजी तयार होत नाहीत. अनेकदा इमारत मालक आणि भागेकरू यांच्यातही वाद असल्याने पुनर्विकास रखडतो. तर पुनर्विकासकाच्या चालढकल भूमिके मुळे ही रहिवाश्यांनी आपला जीव मुठीत राहून राहावे लागत आहे. ज्या ठिकाणी विकासक हलगर्जीपणा दाखवत असेल तर त्या ठिकाणी अशा मोडकळीस आलेल्या इमारती निष्कासीत करून तेथे म्हाडाच्या माध्यमातून पूर्णपणे विकास करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या आहेत.
मुंबईतील अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतींचा सर्व्हे करून असे बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या बैठकीस गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार अमीन पटेल, विनोद घोसाळकर तसेच मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर आणि मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यावेळी उपस्थित होते.Body:सूचना- या बातमीसाठी काल LIVE U वर old buildings नावाने फीड आले आहे, ते आपण वापरू शकतो...Conclusion:
Last Updated : Jul 17, 2019, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.