मुंबई - सोमवारपासून राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यानिमित्ताने सत्ताधाऱ्यांनी रविवारी चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमावर विरोधकांना बहिष्कार टाकला आहे. तसेच हे सरकार असंवैधानिक असल्याची टीका विरोधकांना केली आहे. यावर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधकांना इशारा - हे सरकार पडेल, हे सरकार पडेल असे सातत्याने विरोधीपक्ष बोलत आहेत. पण मागील एका वर्षापासून हे सरकार टिकून आले. आतापर्यंत ते पडले नसून, यापुढेही हे सरकार टिकून राहणार आहे. आधी आम्ही दोघे होतो. आता आम्ही तिघे आहेत. त्यामुळे सरकार पडेल असे बोलू नका नाहीतर अजून काही होईल, असा थेटच इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात फोडाफोडीचा राजकारण आणखी होणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
विरोधी पक्षनेता आम्ही तिघेही होतो. आमच्याकडे सर्व अनुभवी लोकं आहेत. केवळ विरोधाला विरोध न करता, चांगल्याला चांगले म्हणण्याची वृत्ती असली पाहिजे. सरकार जिथे चुकते तिथे नक्की जाब विचारण्याची जबाबदारी विरोधी पक्षाकडे असते. पण सध्या विरोधी पक्ष कुठे आहे ते शोधावे लागेल - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
विरोधकांचे धाबे दणाणले - राज्यात १७ जुलैपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पावसाळी अधिवेशाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार घातला. प्रथेनुसार विरोधकांनी सरकारला पत्र पाठवले आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. विरोधकांचे अवसान गळाल्याचे ते म्हणाले आहेत. विरोधी पक्ष गोंधळेलेला दिसत आहे. तसेच आत्मविश्वास गमावलेला विरोधी पक्ष आहे. आता अजित पवार आमच्याकडे आल्याने विरोधकांचे धाबे दणाणले असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
हेही वाचा -