मुंबई CM Eknath Shinde Return from Davos : तीन दिवसांचा दावोस दौरा आटोपून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं.
राज्यात 2 लाख रोजगार निर्मिती होणार : महायुतीच्या दौऱ्यात 3 लाख 53 हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाले आहेत. 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीबाबत स्वारस्य दाखवण्यात आलंय. तसंच या गुंतवणुकीच्या माध्यमातून 2 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे राज्यात गुंतवणूक करण्यासाठी आर्सेनिल मित्तल, निप्पोन, जिंदाल, अदानी यासारख्या नामांकित कंपन्यांनी स्वारस्य दाखवलंय. तसंच काही देशांतील मंत्र्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच गतवर्षी झालेल्या 1 लाख 37 हजार कोटीच्या सामंजस्य करारांपैकी 80 टक्के करार पूर्ण करण्यात आले होते. यावेळीही केलेले करार पूर्णत्वास नेण्याकडे सरकारचा कटाक्ष राहील, असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय.
-
#LIVE | मुंबई | दावोसहून परतल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद… https://t.co/2mOAqNwa9P
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 18, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#LIVE | मुंबई | दावोसहून परतल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद… https://t.co/2mOAqNwa9P
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 18, 2024#LIVE | मुंबई | दावोसहून परतल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद… https://t.co/2mOAqNwa9P
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 18, 2024
पंतप्रधान मोदी जागतिक नेते : दावोस दौऱ्यावरुन परतल्यावर पंतप्रधान मोंदींबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "जगातील अनेक देशांचे प्रतिनिधी पंतप्रधान मोदींना जागतिक नेता म्हणत आहेत. युनायटेड स्टेट्स, सिंगापूर, स्वित्झर्लंड, जर्मनी, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि जगातील इतर देशांचे प्रतिनिधी मोदी यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगत होते. ते एक गतिमान, दूरदर्शी आणि जागतिक नेते आहेत. ते एक रचनात्मक आणि व्यावहारिक नेते आहेत जे देशाचा विकास करत आहेत. त्यांनी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करताना आम्हाला मदत केली. कारण पंतप्रधान मोदींनी जागतिक स्तरावर आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढवली आहे,"
- महायुतीचे अनेक आमदार उपस्थित : यावेळी विमानतळावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रताप सरनाईक, आमदार अमित साटम, आमदार मनीषा कायंदे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार रवींद्र फाटक, राज्य समन्वयक नरेश म्हस्के आणि शिवसेना तसंच महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
हेही वाचा :