मुंबई : आगामी मनपा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मतदारांना वळवण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपाने विविध ठिकाणी उत्तर भाषिकांच्या छठ पूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आता शिंदे गट उत्तर भाषिकांच्या मताधिक्यासाठी सरसावला असून मुंबईत कृत्रिम तलाव निर्माण (statement of northern speakers) करावेत, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी ही निवेदन मिळताच, तात्काळ गणेशोत्सवाप्रमाणेच तलाव निर्मितीचे आदेश दिले (CM Eknath Shinde ordered immediate construction) आहेत.
कृत्रिम तलावांची मागणी : मुंबईत राहणारे उत्तर भारतीय बांधव दरवर्षी छठ पूजा मोठ्या भक्तीभावाने साजरी करतात. उगवत्या सूर्याला अर्ध्य दाखवून पूजा केली जाते. या पूजेसाठी स्नान करण्याची देखील परंपरा आहे. मुंबई शहरातील सर्व समुद्रकिनारे, तलाव, जलाशय ठिकाणी उत्तर भारतीय छठ पूजा साजरी केली जाते. मात्र, छठ पूजा साजरी करताना देखील पर्यावरणाचे रक्षण व्हावे, अशी इच्छा उत्तर भारतीय नागरिकांना देखील जाणवत होती. शहरातील नैसर्गिक जलाशय, तलाव यांना बाधा पोहचू नये, यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन छठ पूजेसाठी पालिका प्रशासनाने आम्हाला कृत्रिम तलाव उपलब्ध करून घ्यावेत, अशी मागणी केली (construction of lake northern speakers) होती.
मुख्यमंत्र्यांनी घेतली निवेदनाची दखल : बाळासाहेबांची शिवसेना पक्ष तथा शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, किरण पावसकर आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे समन्वयक आशिष कुलकर्णी यांनी कृत्रिम तलाव निर्माण करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदेकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister Eknath Shinde) या निवेदनाची दखल घेत, गतवर्षी देखील मुंबई महानगरपालिकेने छठ पूजेसाठी काही जागी कृत्रिम तलाव तयार करून भाविकांना ती सोय उपलब्ध करून द्यावी, असे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना दिले (statement of northern speakers) आहेत.
उत्तर भाषिकांच्या मतांवर : मुंबई मनपाची आगामी निवडणुका जवळ आल्याने उत्तर भाषिकांच्या मताधिक्यावर डोळा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईभर कार्यक्रम हाती घेत आहेत. आता शिंदे गटाने ही उत्तर भाषिकांसाठी कंबर कसली आहे. उत्तर भाषिकांना आकर्षित करण्याचा राजकीय पक्षांकडून शिंंदे गटाचा प्रयत्न सुरु झाल्याचे बोलले जात आहे. तर आजवर मनसेने छठ पूजेच्या माध्यमातून होणाऱ्या शक्तिप्रदर्शनाला विरोध केला आहे. आता शिंदे - फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र येताना दिसत नाही. त्यामुळे छठ पुजेसाठी शक्तीप्रदर्शन केले तरी मनसेकडून विरोध होण्याची शक्यता धूसर असल्याचे बोलले (immediate construction of lake) जाते.