ETV Bharat / state

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकिस्तान फक्त याच व्यक्तीला घाबरायचे... - स्वातंत्र्यवीर सावरकर

सावरकरांचा अपमान जनता सहन करणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde on veer sawarkar ) म्हणाले. हिंदुत्व परिसंवाद आणि मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत वाहन कार्यक्रमाचे आयोजन दादर येथील सावरकर स्मारक येथे करण्यात आले होते. मुख्यमंत्री यावेळी बोलत होते.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 16, 2022, 10:50 PM IST

Updated : Nov 16, 2022, 11:16 PM IST

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दरारा होता. शिवसेनेतील फुटीनंतर थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्यापर्यंत शिंदे गटातील नेत्यांची मजल गेली आहे. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी अशा विधानांना दुजोरा देत, बाळासाहेबांचे चेले, लेचेपेचे राहील नाहीत, असा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तसेच सावरकरांचा अपमान जनता सहन करणार नाही, असेही ते ( Eknath Shinde on veer sawarkar ) म्हणाले. हिंदुत्व परिसंवाद आणि मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत वाहन कार्यक्रमाचे आयोजन दादर येथील सावरकर स्मारक येथे करण्यात आले होते. मुख्यमंत्री यावेळी बोलत होते.

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल - हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असे म्हणणारे सावरकर होते. सावरकरांना पुन्हा तुरूंगावास भोगावा लागला. त्यावेळी घरदारावर तुळशी पत्र ठेवले, त्याचमुळे आज देश स्वातंत्र्य झाला. मात्र, आजकाल स्वातंत्र्यवीरांचा सातत्याने अपमान सुरू आहे. अशा स्वातंत्र्य वीरांचा वेळोवेळी अपमान करणे हे जे कोणी कृत्य करतंय त्याला राज्यातली आणि देशातली जनता धडा शिकवेल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पाकिस्तान फक्त याच व्यक्तीला घाबरायचे - बाळासाहेब नेहमी म्हणायचे हातावरील रेषा पेक्षा मनगटावरील बळ महत्वाच आहे. त्यामुळे पाकिस्तान एकाच व्यक्तीला घाबरायचे ते म्हणजे बाळासाहेबांना, असे सांगत मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. बाळासाहेबांना अपेक्षित आणि प्रत्येक कृतीचे काम पंतप्रधान यांनी केले. तसेच देशाचा गौरव पसरवण्याचे काम देखील ते करत आहेत. अमरनाथ यात्रेवर जेव्हा संकटाचे ढग आले, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी परखड भूमिका घेतली. मणिशंकर अय्यर यांनी जेव्हा सावरकर यांच्या विरोधात भूमिका घेतली, तेव्हा त्याला जोडो मारो आंदोलन केले. त्यावेळी बाळासाहेबांनी जोडे मारो आंदोलन करण्याचा आदेश दिला. पण आज काय घडतंय, असा सवाल उपस्थित केला.

Last Updated : Nov 16, 2022, 11:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.