मुंबई : मुंबई महापालिका रुग्णालयाच्या (Mumbai Municipal Hospital) कारभाराचे वाभाडे विधानसभेत आज काढण्यात (CM Eknath Shinde on issue of operation delay) आले. रुग्णालयात रखडत असलेल्या ऑपरेशनबाबत छेडण्यात आले. पाच महिन्यांपूर्वी मोठे ऑपरेशन केले. रुग्णालयातील ऑपरेशन त्यापेक्षा छोटे आहेत, असे अजब वक्तव्य केले. त्यामुळे रुग्णालयापेक्षा सत्तांतरासाठी केलेल्या उठाठेवी आजही मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) डोक्यात असल्याची राजकीय वर्तुळात रंगली आहे.
रुग्णालयाबाबत चर्चा : मुंबई कांदिवली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण महापालिका रुग्णालयातील सोई सुविधांचा अभाव असल्याकडे लक्ष वेधीत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थितीत केला. रुग्णालयातील रिक्त पदे, चुकीची औषध खरेदी आणि औषध दिरंगाईबाबत चौकशी करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. रुग्णालयात डॉक्टर अभावी ऑपरेशन उशिरा होत असल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. आमदार अतुल भातखळकर, पराग अळवणी, योगेश सागर, अमीन पटेल, अबू आझमी यांनी मुंबई मनपा रुग्णालयातील कारभाराचा विधानसभेत पाढा वाचला. रुग्णालयाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेवून तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी केली. पश्चिम उपनगरातील बंद होण्याच्या मार्गावर असलेले सेव्हन हिल्स रुग्णालय देखील महापालिकेने ताब्यात घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रश्नांना उत्तरे (CM Eknath Shinde in Winter session) दिली.
उलटसुटल चर्चा : रुग्णालयातील कारभाराची चौकशी केली जाईल. रिक्त पदे तातडीने भरली जातील. मुंबईच्या स्वच्छतेसाठी पाच हजार आरोग्य दूत नेमले जातील. त्याचप्रमाणे आशा वर्कर्सची भरती केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र, ऑपरेशनच्या मुद्द्यावर आम्ही पाच महिन्यांपूर्वी मोठे ऑपरेशन केले असून रुग्णालयातील ऑपरेशन त्यापेक्षा छोटे आहेत. ही समस्या देखील सोडवू, असे अजब विधान केले. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तराने उलटसुटल चर्चा रंगल्या (issue of operation delay) आहेत.
मुख्यमंत्र्यांचे विधान : दहिहंडीच्या वेळी आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली. गणेशोत्सवावेळी मोठा उत्सव साजरा केला. नवरात्रोत्सवात देखील असेच विधान केले होती. मुख्यमंत्री आजवर ज्या-ज्या कार्यक्रमात जातात. तिकडे सत्तांतराच्या वेळी केलेल्या बंडाचा दाखला देताना, किती महान कार्य केले याचा पाढा वाचतात. विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी असेच उत्तर दिल्याने विरोधकांची नाराजी ओढवून घेतली (Eknath Shinde) आहे.