ETV Bharat / state

CM Eknath Shinde : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने लोकांना संजीवनी ठरेल - मुख्यमंत्री - balasaheb thackeray hospital in mumbai

मुंबईचे सौंदर्यीकरण, चांगले शिक्षण आणि आरोग्यदायी सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे. मुंबई स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी मुंबई झाली पाहिजे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे.

CM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Nov 17, 2022, 7:39 PM IST

Updated : Nov 17, 2022, 8:12 PM IST

मुंबई - आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा स्मृतिदिन आहे. आम्ही त्यांचे विचार घेऊन सरकार स्थापन केले आहे. त्यांच्या सर्वसामान्यांच्या आरोग्याबाबत ज्या इच्छा होत्या त्यानुसार आज हे दवाखाने सुरु झाले आहेत. यामुळे पैशाअभावी नागरिकांना उपचार मिळाले नाही असे मुंबईत कधीही होणार नाही. हा दवाखाना लोकांना संजीवनी आणि वरदान ठरेल. मुंबईचे सौंदर्यीकरण, चांगले शिक्षण आणि आरोग्यदायी सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे. मुंबई स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी मुंबई झाली पाहिजे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे.

दवाखाना लोकांना संजीवनी - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे काळा किल्ला धारावी आणि मुंबईमधील ५१ दवाखान्यांचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बोलताना, मुंबईतील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण आज झाले आहे. कोविड काळादरम्यान ठाण्यात ५० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरु केले. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी मुंबईत आज ५० दवाखाने सुरु केले आहेत. मुंबईमधील २२७ वॉर्डमध्ये असेच दवाखाने लवकरच सुरु होतील. यामध्ये १४७ चाचण्या मोफत होणार आहेत. एमआरआय चाचणी सुद्धा मोफत होणार आहे. पैशाअभावी नागरिकांना उपचार मिळाले नाही असे मुंबईत होणार नाही. घराजवळ उपचार मिळणार असल्याने हा दवाखाना लोकांना संजीवनी ठरेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात ७०० ठिकाणी दवाखाने सुरु करणार - राज्य सरकारच्या वतीने राज्यात ७०० ठिकाणी दवाखाने सुरु करणार आहोत. धारावीकरांना स्वतःचे हक्काचे घर मिळण्यासाठी पुनर्विकास झाला पाहिजे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी सरकार स्थापन झाल्यावर त्वरित निर्णय घेतला आहे. मुंबईतील रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडतात. मुंबईतील २ हजार पैकी १ हजार किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण बाकी आहे. आता ४०० किलोमीटरच्या रस्त्यांच्या यावेळी काँक्रीटीकरण केले जाणार आहे. मार्चनंतर इतर रस्ते काँक्रीटचे होतील. मुंबईचे सौंदर्यीकरण, चांगले शिक्षण आणि आरोग्य यावर भर दिले जाणार आहे. २ अडीच वर्षे कोविडमुळे गप्प बसले. मात्र आता मुंबई स्वच्छ सुंदर आणि आरोग्य दायी मुंबई झाली पाहिजे. गोवरबाबत ही चांगले काम करून त्याला आटोक्यात आणा. हे सरकार तुमचे सर्वसामान्य लोकांचे आहे त्यांना न्याय देण्याचे काम करूया असे मुख्यमंत्री म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजनेमुळे नागरिकांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा मोफत व सोईच्या वेळेनुसार सहज उपलब्ध आहे. नागरिकांचा औषध उपचारावर खिशातून होणारा खर्च (Out of pocket expenditure) कमी होण्यास मदत होईल. या योजने अंतर्गत साधारणपणे २५ ते ३० हजार लोकसंख्येसाठी १ दवाखाना, याप्रमाणे पोर्टा केबिन मधील दवाखाने हे सकाळी ७ ते दुपारी २, त्यानंतर दुपारी ३ ते रात्री १० या कालावधी दरम्यान कार्यरत असणार आहेत. तर उपलब्ध दवाखान्यांमध्ये सुरु करण्यात आलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने हे सकाळी ९ ते दुपारी ४ आणि दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत सुरु करण्यात येत आहेत. यासाठी प्रत्येक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी (MBBS), १ परिचारिका, १ औषध निर्माता आणि १ बहुउद्देशीय कामगार यांची नेमणूक करण्यात आली आहे. दवाखान्याची दर्जोन्नती करून विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध दवाखान्यात पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत देण्यात येत आहे. उपलब्ध दवाखान्याची दर्जोन्नती करून (कान-नाक-घसा तज्ञ, नेत्रचिकित्सा, स्त्री- रोग तज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचा रोग तज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ञ आदी) विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध दवाखान्यात पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत देण्यात येणार आहे. सदर दवाखान्यांमधून टॅब पद्धतीने व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशील नोंदविण्यात येईल, ज्यायोगे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखानेचे कामकाज हे विना कागद पद्धतीने (पेपरलेस) असणार असून त्यामुळे हे दवाखाने इकोफ्रेन्डली आहेत.

Last Updated : Nov 17, 2022, 8:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.