ETV Bharat / state

Eknath Shinde on Uddhav Thackeray : बाळासाहेबांनी अपमान सहन करणाऱ्याला जोड्याने हाणला असता; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा - सावरकर गौरव यात्रा

बाळासाहेबांनी अपमान सहन करणाऱ्याला जोड्याने हाणला असता, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ राज्यभरात लवकरच 'सावरकर गौरव यात्रा' काढणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Eknath Shinde on Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Mar 27, 2023, 7:37 PM IST

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदेत संवाद साधताना

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेब असते तर सावरकरांचा अपमान करणाऱ्याला जोड्याने मारले असतेच शिवाय निमुटपणे ते सहन करणाऱ्यालाही जोड्याने हाणले असते, असा टोला उद्धव ठाकरेंचे नाव न घेता पत्रकार परिषदेतून लगावला. सावरकरांच्या समर्थनार्थ राज्यभरात लवकरच सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचे ते म्हणाले.

जोड्याने हाणले असते : मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून दिली. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचे अपमान केल्यामुळे मनीशंकर अय्यर यांच्या थोबाडात मारली होती. परंतु ठाकरेंची भूमिका दुट्टपी आहे. सावरकरांची हिंदुत्वाची भूमिका मान्य असेल तर ठाकरेंनी तशी हिंमत दाखवावी. बाळासाहेब असते तर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जोडे मारले असते आणि जे निमुटपणे सहन करत आहेत. त्यांनाही जोड्याने हाणले असते, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

सावरकरांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आक्रमक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार राहुल गांधींकडून अपमान केला जातो. भारताला देशभक्तांच्या त्यागातून स्वातंत्र्य मिळाला आहे. परंतु, जाणीवपूर्वक सावरकर यांना बदनाम करायचा प्रयत्न होत आहे आणि त्याचा निषेध देशभर होत आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमधील सेक्युलर जेलमध्ये यातना भोगल्या. राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांवर सातत्याने टीका केली जात आहे. राहुल गांधी यांच्या कृतीचा, वृत्तीचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे. सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. सावरकर होण्यासाठी देशाबद्दल प्रेम असायला हवे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ठाकरेंची दुटप्पी भूमिका : मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आपल्या देशाची निंदा परदेशात जाऊन करणे त्याचा निषेध करायल पाहिजे. प्रत्येकाने सावरकरांच्या अवमानाचा निषेध केला पाहिजे. परंतु, हिंदुत्वावर बोलणारे जे नेते आहेत त्यांनी राहुल गांधींवर एक शब्द बोलले नाहीत. जाहीर सभांमध्ये वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करण्याचा अत्यंत बालिश आणि जनतेला मूर्ख समजण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केला आहे. पण जनतेने तुमची दुटप्पीपणाची भूमिका ओळखली आहे. उद्धव ठाकरे एकीकडे ही विधाने करत असताना दुसरीकडे त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे मात्र, 'दोन्ही पक्ष वेगळे आहेत आणि ती काँग्रेस पक्षाची भूमिका आहे', असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत करत आहेत. म्हणजेच कुणी काय बोलावे, हेही घरात बसून ठरविल्यासारखे आहे, असा चिमटा ठाकरेंना काढला.

गौरव यात्रा काढणार : मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आता अशी कितीही मल्लिनाथी केली, तरी त्याचा काहीही फायदा नाही. राहुल गांधींनी अपमान केल्यानंतर ही काही नेते मूग घेऊन गप्प होते. आता सभेतून सावरकरांचा आपण अपमान करणार नाही, असे सांगत आहेत. सहन करणार नाही म्हणजे नक्की काय करणार, असा खोचक सवाल मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांना विचारला. तसेच, राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा पुन्हा जाहीर धिक्कार आणि निषेध केला. तसेच या अपमानाविरोधात राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात 'वीर सावरकर गौरव यात्रा' काढण्यात येतील आणि ठिकठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यभरात निषेध नोंदवणार - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ठाकरेंमध्ये सत्तेला लाथ मारायची हिंमत नाही. केवळ भाषणातून ते विरोध करतील. परंतु आम्ही ते सहन करणार नाही. राहुल गांधी यांच्या निषेधार्थ राज्यभरात गौरव यात्रा काढणार असून त्यांचा निषेध नोंदवला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा : Uddhav Thackeray Malegaon : सावरकर आमचे दैवत, उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावले; शिंदेंवरही डागली तोफ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.