मुंबई - मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस देण्यात येईल, ( Diwali bonus Announce by CM Eknath Shinde ) असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार ( Diwali Bonus for Govt and Semi Govt Employees ) आहे.
आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस - मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीत मुंबई महापालिकेचे ९३ हजार आणि बेस्टचे २९ हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविका यांना दिवाळी बोनस ( Diwali Bonus for Health Care Workers ) मिळणार आहे.
विविध विभागांचे अधिकारी उपस्थित - खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी तसेच संदिप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी, उत्तम गाडे, अशोक जाधव यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
कोरोना काळाता उत्तम कामगिरी - कोविडच्या बिकट परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले ( Bonus for good performance during Corona period ) आहे. मुंबईतील कोविडची परिस्थिती नियंत्रणात राखण्यात डॉक्टर्स, सर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. विकास कामांवर खर्च झालाच पाहिजे. पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन ही मिळाले पाहिजे. विकास काम आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजना यांचा समतोल राखावा लागेल. कर्मचारी आणि नागरिक आपलेच आहेत असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना 'आनंदात दिवाळी साजरी करा. पण सगळ्यांनी मुंबईकरांसाठी मनापासून काम करा,' असे आवाहन केले.
विकास कामांतील अडीअडचणी प्राधान्याने सोडविल्या - मुंबई महापालिकेशी निगडीत विकास कामांतील तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी या प्राधान्याने सोडविल्या जातील. सगळ्यांनी आता मुंबईकरांसाठी मनापासून काम केले पाहिजे. रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे नागरिकांच्या मनासारखी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी अभियंत्यांपासून ते सर्वांनीच दक्षता घ्यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
'श्रमसाफल्य' आणि 'आश्रय' - चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठीची 'श्रमसाफल्य' आणि 'आश्रय' या योजनेतील घरे उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. विविध विकास यंत्रणांनासोबत घेऊन अशी घरे मोठ्या संख्येने उपलब्ध व्हावीत यासाठी स्वतंत्र समन्वय बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दिवाळी बोनसची मागणी आणि त्यातील वाढीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिकेच्या सर्वपक्षीय अशा कर्मचारी संघटनाना विश्वासात घेऊन बैठक घेतली. बोनससाठी विविध घटकांचा सहानुभूतीने विचार केल्याबद्दल उपस्थित संघटना पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.