ETV Bharat / state

CM DCM Delhi Visit : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत अमित शाह यांची घेतली भेट, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा; महिना ठरला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस गुरूवारी सायंकाळी तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी दोघेही मुंबई विमानतळावर एकत्र भेटले. त्यानंतर स्वतंत्र विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील जुलै महिन्याच्या १५ तारखेच्या आत अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी हे दोन्ही नेते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. गुरूवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबर या दोन्ही नेत्यांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून भेटली आहे.

CM DCM at Delhi Visit
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
author img

By

Published : Jun 30, 2023, 8:37 AM IST

Updated : Jun 30, 2023, 7:47 PM IST

उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मुंबई : शिंदे फडणवीस सरकारला पूर्ण होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर होते. आषाढी एकादशीनिमित्त पूर्ण कुटुंबासोबत पंढरपूरमध्ये असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरूवारी पंढरपूरहून परिवारासह मुंबईला पोहोचले. त्यानंतर ते सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीला जाण्यापूर्वी शिंदे - फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती. तसेच दिल्लीला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत दिल्लीमध्ये भेट झाली आहे. यांच्यासोबत गुरूवारी रात्री उशिरा दिल्लीत बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षाची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. तसेच रात्री ते उशिरा परतल्याची माहिती मिळत आहे.

समन्वय समितीची होणार स्थापना : शिंदे - फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना दुसरीकडे राज्यात शिंदे शिवसेना गट व भाजप पक्षाची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा विचार बऱ्याच दिवसापासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आहे. त्या अनुषंगाने भाजपचे तीन ते पाच त्याचबरोबर शिवसेनेचे (शिंदे गट) सुद्धा तीन ते पाच नेते या समितीत असतील असे सांगण्यात आले आहे. लवकरच समितीची घोषणा होऊन त्याची पहिली बैठकही आयोजित केली जाणार आहे. परंतु या समन्वय समितीत कुठले नेते असतील याचे सर्वस्वी अधिकार हे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ४ जुलै रोजी भाजपच्या सर्व खासदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश सर्व खासदारांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणे फार गरजेचे आहे. त्या अनुषंगाने दिल्लीमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे. त्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाचा समावेश केला जाईल व त्यांना कुठली खाती दिली जातील, याबाबत चर्चा झाली आहे. शिंदे गटामध्ये असलेल्या पाच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. पण सध्या तरी कुठलीही कारवाई करू नये किंवा त्यांच्या मंत्रीपदावरून काढले जाऊ नये, अशी ही माहिती समोर येत आहे. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये खराब कामगिरीमुळे १२ किंवा त्यापेक्षा अधिक मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा काही संबंध नाही. केंद्राचा कधी होणार हे आम्हाला माहिती देखील नाही. आमचा राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्त रस आहे. राज्यातील अनेक प्रश्न असतात त्यासाठी केंद्राची भेट घ्यावी लागते. तसेच जुलै महिल्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला. आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले.

यासाठी दिल्ली वारी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा काही संबंध नाही. केंद्राचा कधी होणार हे आम्हाला माहिती देखील नाही. आमचा राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्त रस आहे. राज्यातील अनेक प्रश्न असतात त्यासाठी केंद्राची भेट घ्यावी लागते. त्याचा पाठपुरावा करावा लागतो, या संदर्भातच अनेक बैठक असतात, त्यामुळे केंद्रात जावे लागते असे फडणवीस म्हणाले. दिल्लीला जाण्यापूर्वी शिंदे -फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती. तसेच दिल्लीला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुप्त भेट झाली होती.

मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच : राज्य मंत्रिमंडळाबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच अपेक्षित आहे. या विस्तारामध्ये शिंदे गटाला दोन मंत्री पद दिली जाऊ शकतात. यामध्ये खासदार गजानन किर्तीकर व खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा विचारही केला जाण्याची शक्यता आहे. यांना कुठली मंत्री पद दिली जातील, याबाबतही एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :

  1. Eknath Shinde : 'फोटो असो किंवा नसो, लोकांच्या मनात आम्हीच' ; जाहिरातीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
  2. Fadnavis On CM Post : पुढील मुख्यमंत्री शिंदे नसणार?, फडणवीसांच्या विधानामुळे तर्कांना उधाण

Last Updated : Jun 30, 2023, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.