मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पेशल विमानाने अयोध्येनगरीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे रविवारी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यांचा हा दौरा सध्या चर्चेत आहे. स्पेशल विमानाने शिंदे आपल्या मंत्र्यांसोबत शनिवारी सायंकाळी मुंबईवरून अयोध्येसाठी रवाना झाले होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने आमचे स्वागत केले त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. हा राजकीय दौरा नाही. मी अनेकवेळा अयोध्येला आलो आहे. पण मु्ख्यमंत्री म्हणून मी पहिल्यांदाच अयोध्येला आलो आहे.
विरोधकांवर टीका - राज्यात सत्तेवर आल्यानंतर अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. सरकारच्या चांगल्या निर्णयामुळे विरोधक भांबावून गेले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काहीजण घरात बसले होते, ते देखील घराबाहेर पडून जनतेला भेटत आहेत. परिवर्तनाची सुरुवात आहे, असा चिमटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरेंना काढला. अजित पवार यांच्यावरही मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधत, शेतकऱ्यांना पाणी ऐवजी काय देतात याची आठवण करून दिली.
-
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde along with Shiv Sena MPs and MLAs reach Lucknow airport.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Shiv Sena leaders will visit Ayodhya tomorrow. pic.twitter.com/jXMZWEgOKG
">#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde along with Shiv Sena MPs and MLAs reach Lucknow airport.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 8, 2023
Shiv Sena leaders will visit Ayodhya tomorrow. pic.twitter.com/jXMZWEgOKG#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde along with Shiv Sena MPs and MLAs reach Lucknow airport.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 8, 2023
Shiv Sena leaders will visit Ayodhya tomorrow. pic.twitter.com/jXMZWEgOKG
अयोध्येशी जिव्हाळ्याचे नाते - अयोध्येत राम मंदिर व्हावे, ही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि रामभक्त यांची इच्छा आहे. शिवसेना आणि अयोध्या यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्याकडून सहकार्य मिळणे, ही अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्यात रावणराज सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांचा जन्म झाला नव्हता तेव्हापासूनच आम्ही काम करत आहोत. त्यामुळे त्यांच्या टीकेला कामांतून चोख उत्तर देऊ, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
भाजपचे नेते सहभागी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावरुन अयोध्येसाठी उड्डाण केले होते. एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात शिवसेना आणि भाजपचे नेते सहभागी झाले आहेत. भाजप नेते संजय कुटे, राम शिंदे, गिरीश महाजन देखील अयोध्येला रवाना झाले होते.
स्पेशल रेल्वे अयोध्येत दाखल - मागील महिन्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला होता. 9 एप्रिल रोजी सकाळी शिंदे हे अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्यावरून बरीच राजकीय चर्चा राज्यात झाली. शुक्रवारीच ठाण्यातून विशेष रेल्वे कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येसाठी रवाना झाली होती. त्या रेल्वेत जवळपास 3 हजार शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना झाले होते.
अयोध्यानगरी सजली - मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच राम नगरी अयोध्येत येत आहेत. मु्ख्यमंत्री शिंदेंच्या भव्य स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण अयोध्यानगरी भगवीमय झाली आहे. संपूर्ण अयोध्येत स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
असा असेल अयोध्या दौरा - मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री शिंदे हे रविवारी दुपारी 12 वाजता प्रभू रामलल्लाच्या आरतीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता एकनाथ शिंदे राम मंदिर उभारणीच्या कामाची पाहणी करणार आहेत. तसेच दुपारी अडीच वाजता पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत. यानंतर एकनाथ शिंदे दुपारी साडेतीन वाजता अयोध्येतील लक्ष्मण किल्ला संकुलात साधू - मुनींची भेट घेऊन सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे शरयू नदीच्या आरतीला देखील उपस्थित राहण्यासाठी सायंकाळी 6 वाजता आरतीस्थळी पोहोचतील. त्यानंतर सायंकाळी 7.05 वाजता एकनाथ शिंदे रस्तेमार्गाने लखनौला रवाना होतील.
हेही वाचा - CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी अयोध्या भगवीमय; शहरभर लागले बॅनर्स!