ETV Bharat / state

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यरत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होण्याची शक्यता आहे. यामध्ये निकटवर्तीयांची सत्तावाटपाबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 8, 2019, 2:04 PM IST

Updated : Nov 8, 2019, 7:25 PM IST

मुंबई - अद्यापही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. विधानसभेची मुदत संपणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर राज्यपालांकडून फडणवीसांना काळजीवाहू मुख्यमंत्री पद देण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होण्याची शक्यता आहे. यामध्ये निकटवर्तीयांची सत्तावाटपाबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी देणार राजीनामा?

विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद आणि समान सत्तावाटप यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये खडाखडी सुरू आहे. अद्यापही कुठल्याही पक्षाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. सत्ता स्थापनेसाठी अनेक राजकीय नेत्यांच्या बैठकींचे सत्र सुरू आहे. सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकी सुरू आहेत. त्यामधून आता सत्ता स्थापनेचा काही तोडगा निघतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्लीत अमित शाहंची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातली सत्ताकोंडी फुटेल, असे वाटले होते. मात्र, आता तसे चिन्हे दिसत नाही. राज्याच्या पातळीवर सत्ता स्थापनेचा तिढा सोडवावा, अशी पक्षश्रेंष्ठींची अपेक्षा आहे. मात्र, अद्यापही सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही.

दरम्यान मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री राम शिंदे, खासदार कपिल पाटील, मुरबाडचे आमदार किसन कथोरे, आमदार प्रसाद लाड यांची मुख्यमंत्र्यांशी खलबते सुरू होती. तसेच महायुतीला जनादेश मिळाला आहे. भाजप भूमिकेवर ठाम असून महायुतीचेच सरकार आणणार असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Intro:Body:mh_mum_bjp_core_meeting_day4__mumbai_7204684

Vijay wkt
live 3G live7

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांची खलबतं

मुख्यमंत्री राजीनाम्यासाठी राज्यपालांची भेट घेणार ?

मुंबई: राज्यात सत्तास्थापनेचा तिढा पंधरा दिवशी सुटला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपा कोअर कमिटीची बैठक अपेक्षित असून सत्तावाटपाच्या सुत्रावर निकटवर्तीयांसह निश्चित होत नसल्याची सुत्रांची माहीती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर करतील अशी अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातली सत्ताकोंडी फुटेल, असं वाटलं होतं. मात्र असं काही घडताना दिसत नाहीय.

राज्याच्या पातळीवर सत्ता स्थापनेचा तिढा सोडवावा अशी पक्षश्रेष्टींची अपेक्षा आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आ. अभिमन्यु पवार, माजी मंत्री राम शिंदे , खा. कपिल पाटील, मुरबाडचे आ. किसन कथोरे आ. प्रसाद लाड यांची मुख्यमंत्र्यांशी खलबते सुुरु होती.

महायुतीला जनादेश मिळाला आहे. भाजपा भुमिकेवर ठाम आहे. महायुतीचच सरकार आणणार आहे, असा दावासुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

आज भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मंत्रीपदाच्या वाटपावर चर्चा आणि राज्यपाल भेट घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांचा राजीनामा देतील अशी माहीती आहे. मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर राज्यपाल फडणवीस यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची सुत्र सोपवतील अशी अपेक्षा आहे.

-
Conclusion:
Last Updated : Nov 8, 2019, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.